पाच वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करणारा मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी (दि. 26 मे) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पराभूत झाला. गुजरात टायटन्स संघाने मुंबईला 62 धावांनी पराभवाचा धक्का दिला. तसेच, आयपीएल 2023 स्पर्धेचे अंतिम तिकीट मिळवले. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शुबमन गिल याने 129 धावांची विस्फोटक खेळी केल्यामुळे गुजरातने 233 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाचा डाव 171 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे मुंबईचे अंतिम सामन्यात पोहोचण्याची स्वप्न भंगले. अशात मुंबईच्या पराभवाचे कारण ठरलेल्या 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात…
मुंबईच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले पाच खेळाडू
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या पराभवामागील सर्वात मोठ्या कारणामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याचाही समावेश आहे. जगातील अव्वल फलंदाजांमध्ये सामील असलेला रोहित सलग सातत्याने दुसऱ्या प्ले-ऑफ सामन्यात अपयशी ठरत आहे. भलेमोठे आव्हान मिळाले असताना मुंबईला रोहितकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, तो यामध्ये अपयशी ठरला. त्याने या सामन्यात 7 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार मारत फक्त 8 धावा केल्या. त्यामुळे मधल्या फळीतील खेळाडूंवरील दबाव वाढला.
पीयुष चावला
संघाचा अनुभवी गोलंदाज पीयुष चावला (Piyush Chawla) हा आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मात्र, गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने 15च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या. त्याने या सामन्यात फक्त 3 षटके गोलंदाजी केली, पण यादरम्यान त्याने 45 धावा खर्च केल्या. यावेळी त्याला फक्त 1 विकेट घेता आली.
ख्रिस जॉर्डन
वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) हा क्वालिफायर 2 सामन्यात सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज ठरला. त्याने गुजरातविरुद्ध 4 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 56 धावा खर्च केल्या. यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नाही. विशेष म्हणजे, त्याने या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन यालाही दुखापतग्रस्त केले. अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना तो संपूर्ण हंगामात अपयशी ठरला. ईशान दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुंबईला आपली संपूर्ण फलंदाजी फळी बदलावी लागली.
विष्णू विनोद
ईशान किशन याच्या जागी संघात विष्णू विनोद (Vishnu Vinod) याची एन्ट्री झाली होती. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो खास कामगिरी करू शकला नाही. कॅमरून ग्रीन बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी उतरलेल्या विनोदला मोठे फटके मारता आले नाहीत. तो फक्त 5 धावा करून बाद झाला. त्यामुळे सूर्यकुमार यादव याच्यावरील दबाव वाढला.
टीम डेविड
टीम डेविड (Tim David) याने पॉवरप्लेमधील सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शुबमन गिल (Shubman Gill) याचा झेल सोडला होता. यानंतर गिल थेट 129 धावांपर्यंत पोहोचला. ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली. त्यानंतर फलंदाजी करतानाही त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याच्याकडे राशिद खान याच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करता आली नाही. फक्त 3 चेंडू खेळून तो 2 धावांवर तंबूत परतला. सामना संपवण्याची ताकद राखणारा डेविड क्वालिफायर दोन सामन्यात वाईटरीत्या अपयशी झाल्यामुळे मुंबईला पराभवाचे तोंड पाहावे लागले. (5 culprits of mumbai indians defeat gujarat titans ipl 2023 qualifier 2)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा
मुंबईच्या गोलंदाजांना चोपल्यानंतर दमदार गिलचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘मी टी20 वर्ल्डकपनंतर…’