टी२० क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांपैकी सर्वात रोमांचक क्रिकेट आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, दमदार फटकेबाजी व सामन्यासाठी लागणारा वेळ. वनडे क्रिकेटमध्येही मोठ-मोठे शॉट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्याची प्रसिद्धीही तेवढीच आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या दोन्ही स्वरूपात जमीन-आस्मानचा फरक आहे.
कोणत्याही खेळाडूसमोर सर्वात मोठे आवाहन असते, ते म्हणजे या दोन्ही स्वरूपात सारख्याच मानसिकतेने खेळणे. जो खेळाडू कोणत्याही परिस्थितीचा सामना करत मैदानावर टिकू शकतो, त्याच खेळाडूला वनडे आणि टी२० दोन्हीमध्ये आपली छाप पाडता येते.
आजपर्यंत असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी ५० षटकांच्या वनडे सामन्यात चांगले प्रदर्शन केले. पण त्यांना २० षटकांच्या टी२०मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.
जाणून घेऊया अशा ५ खेळाडूंविषयी जे वनडेमध्ये शानदार खेळले पण टी२० मध्ये त्यांना चमकदार कामगिरी करता आली नाही. 5 hard hitting odi players who failed in t20 cricket.
रिकी पाँटिंग –
रिकी पाँटिंग हा जगातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने अनेक मोठ-मोठ्या कारनामे केले आहेत. बऱ्याचदा आपल्या संघाला कसोटी आणि वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचवण्यातही त्याला यश आले आहे. शिवाय, पाँटिंगने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला २ वेळा विश्वचषक जिंकून दिला आहे.
यशस्वी कर्णधाराव्यतिरिक्त पाँटिंग हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. २००३सालच्या भारताविरुद्धच्या विश्वचषक अंतिम सामन्यातील त्याची कामगिरी अविस्मरणीय ठरली. त्याने वनडेमध्ये आतापर्यंत ३७५ सामन्यात ४२.०३च्या सरासरीने १३००० पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा ८०.३९ इतका होता.
मात्र, त्याला टी२०त जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने टी२०त केवळ १७ सामने खेळत ४०१ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा १३२.७८ इतका होता.
गमतीचा भाग म्हणजे त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच नाबाद ९८ धावा केल्या होत्या.
सौरव गांगुली –
‘प्रिंस ऑफ कोलकाता’ म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली, हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारत २००३सालच्या विश्वचषकात उपविजेता ठरला होता. शिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत मिळून त्याने वनडेत सलामीला फलंदाजी करताना अनेक मोठे विक्रम केले आहेत.
गांगुलीने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३११ सामन्यात ४१.०२च्या सरासरीने ११३६३ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा ७३.७० इतका होता, जो वनडे क्रिकेटमध्ये चांगला समजला जातो.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गांगुलीला खेळण्याची संधी मिळाली नाही. जेव्हा भारतीय संघ २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये विश्वचषक खेळण्यासाठी गेला तेव्हा गांगुलीही संघाबरोबर जाण्यास इच्छुक होता. परंतु द्रविड व तेंडूलकरने युवा खेळाडूंना संधी म्हणून माघार घेतल्याने गांगुलीनेही माघार घेतली होती.
तर, लीग टी२० क्रिकेटमध्ये गांगुलीने 77 सामने खेळले. तरीही तो फक्त 1726 धावा करू शकला. त्याची सरासरी (२५.०१) आणि स्ट्राईक रेट (१०७) हादेखील विशेष नव्हता. गांगुलीने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाकडूनही टी२० सामने खेळले आहेत. पण यावेळीही त्याचे प्रदर्शन खास नव्हते.
क्रिस केर्न्स –
क्रिस केर्न्स हा न्यूझीलंड संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू होता. त्याच्या दमदार फटकेबाजीने तो मोठ-मोठ्या खेळी करत असायचा. केर्न्स ची १९९९मध्ये क्राइस्टचर्च येथील भारतविरुद्धच्या वनडे अविस्मरणीय खेळी केली होती. यावेळी ८० चेंडूत त्याने ११५ धावांची खेळी केली होती.
आपल्या वनडे कारकिर्दीत क्रिसने २१५ सामने खेळले आहेत. यात त्याने ८४.२६च्या स्ट्राईक रेटने ४९५० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १५३ षटकारांचा समावेश आहे.
वनडेत एवढी चांगली आकडेवारी असूनही क्रिसचे टी२०तील प्रदर्शन जास्त चांगले नव्हते. त्याने टी२०त केवळ २ सामने खेळत ३ धावा केल्या आहेत.
नॅथन ऍस्टल –
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू नॅथन ऍस्टलचे वनडेतील विक्रम शानदार आहेत. त्याने वनडेत २२३ सामने खेळत ७०९० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १६ शतकांचा समावेश आहे. शिवाय न्यूझीलंडकडून वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही त्याचा समावेश आहे.
मात्र, टी२०तील त्याच्या विक्रामांची नोंद खूप कमी आहे. नॅथनने न्यूझीलंडकडून ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळत फक्त ७४ धावा केल्या आहेत. तर, आयसीएलमध्ये इंडियन्स चॅम्प्सकडून खेळताना त्याने २२ सामन्यात ५४५ धावा केल्या आहेत.
लान्स क्लूजनर –
लान्स क्लूजनर हा १९९०च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेचा शानदार अष्टपैलू क्रिकेटपटू होता. १९९९च्या विश्वचषकातील त्याची खेळी शानदार होती. क्लूजनरने दक्षिण आफ्रिकाकडून १७१ सामन्यात २ शतकांसह ३५७६ धावा केल्या होत्या. यावेळी त्याची सरासरी ४१.१० तर स्ट्राईक रेट हा ८९.९१ इतका होता.
क्लूजनरची दमदार फटकेबाजी मात्र टी२०मध्ये चालू शकली नाही. त्याने लीग टी२० क्रिकेटमध्ये ५३ सामने खेळताना फक्त ४ वेळा ५०पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. १३६.१०च्या स्ट्राईक रेटने त्याने १०१४ धावा केल्या होत्या. २००४मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या क्लुसनरला आंतरराष्ट्रीय टी२० सामने मात्र खेळता आले नाहीत.
ट्रेंडिंग घडामोडी-
क्रिकेटसाठी त्याने अलिशान घर, महागडी गाडीसह सर्व विकले, आता आली अशी वेळ..
आशिया खंडाबाहेर धोनीला हा पराक्रम कधीही जमलाच नाही पण पंतने…
६ असे रोहमहर्षक टी२० सामने, ज्यात भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकला होता…