भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत न्यूझीलंडने सलग 2 सामन्यात विजय मिळवून 2-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान याच मालिकेतील तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा युवा स्टार फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) 90 धावांवर बाद झाला. या बातमीद्वारे आपण वयाच्या 25व्या वर्षी 90 धावांवर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
5) शुबमन गिल- या यादीत शुबमन गिल पाचव्या स्थानी आहे. भारताचा युवा स्टार फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) वयाच्या 25व्या वर्षी 4 वेळा 90 धावांमध्ये फसला आहे. न्यूझीलंड संघाविरूद्धच्या मुंबई कसोटीत शुबमन गिल 90 धावांवर बाद झाला.
4) विराट कोहली- भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) वयाच्या 25व्या वर्षापर्यंतच्या कारकिर्दीत 4 वेळा 90 धावांचा शिकार ठरला होता.
3) राहुल द्रविड- भारताचा विश्वचषक विजेता प्रशिक्षक आणि माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) वयाच्या 25व्या वर्षी 5 वेळा 90 आणि 100 धावांच्या आत बाद झाला होता.
2) सचिन तेंडुलकर- या यादीत दुसऱ्या स्थानी क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर वयाच्या 25व्या वर्षापर्यंत 5 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 90 धावांचा शिकार झाला होता.
1) रिषभ पंत- या यादीत भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) पहिल्या स्थानावर आहे. वयाच्या 25व्या वर्षी पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 वेळा 90 धावांचा शिकार ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी क्रिकेटरच्या निधनाची खोटी माहिती पसरवल्यानंतर ‘या’ दिग्गजाने मागितली माफी!
इंग्लिश फलंदाजानं घेतला स्टुअर्ट ब्रॉडचा बदला! भारतीय खेळाडूच्या 6 चेंडूवर ठोकले 6 षटकार
सरफराजच्या अपयशासाठी टीम मॅनेजमेंट कारणीभूत? युवा फलंदाजाच्या दुरवस्थेला कोण जबाबदार?