श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकतील पराभवाचं दु:ख पचवत आता भारतीय संघ मायदेशात बांगलादेशविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे. श्रीलंकेने 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभूत केले होते. भारतीय संघाने 1971 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतीय संघाकडून आतापर्यंत 256 खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतीय संघाने या फॉरमॅटमध्ये दोन विश्वचषकही जिंकले आहेत, ज्यामध्ये 1983 आणि 2011 च्या विश्वचषकाचा समावेश आहे. याशिवाय भारतीय संघाने या फॉरमॅटमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली आहे.
दरम्यान आपण या लेखात अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या वनडे पदार्पणात भारतीय संघाचा पराभव झाला होता.
5. वीरेंद्र सेहवाग
या यादीत टीम इंडियाचा स्फोटक माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावाचाही समावेश आहे. सेहवागने भारताकडून 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सेहवागलाही या सामन्यात फारसे काही करता आले नाही आणि तो केवळ एक धाव घेऊन बाद झाला. या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
4. सुरेश रैना
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. रैनाने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 226 वनडे सामने खेळले. ज्यामध्ये त्याच्या नावावर 5615 धावांचा समावेश आहे.
3. विराट कोहली
भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि रन मशिन विराट कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात कोहली 22 चेंडूत केवळ 12 धावा करून बाद झाला होता. श्रीलंकेने 8 विकेट्स शिल्लक असताना हा सामना जिंकला होता.
2. रवींद्र जडेजा
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात जडेजाने 6 षटके टाकली, पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण जडेजाने फलंदाजीत कमाल केली होती. पदार्पणाच्या सामन्यात जडेजाने 60 धावांची नाबाद खेळी केली होती. पण भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नव्हता.
1. आर अश्विन
भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात अश्विनने फलंदाजी करताना 38 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट्सही घेतल्या, मात्र भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: खणखणीत षटकार ठोकून किशनने संघाला मिळवून दिला शानदार विजय…!
धोनी, कोहली की रोहित सर्वोत्तम कर्णधार कोण? बुमराहनं केला मोठा खुलासा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण