---Advertisement---

येत्या काळात कसोटीतून निवृत्त होऊ शकतात असे 5 भारतीय खेळाडू

---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने आज (12 मे) रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (Virat Kohli Retired From Test Cricket) ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. याधीच रोहित शर्माने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे भारतीय संघाला आता एका पाठोपाठ दुसरा धक्का बसला आहे विराटने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे, तर रोहितने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरिद्वारे निवृत्तीची माहिती दिली. या दोन दिग्गजांनंतर येत्या काळात लवकरच हे 5 स्टार खेळाडूदेखील कसोटीतून निवृत्तीची घोषणा करू शकतात. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

1) चेतेश्वर पुजारा- पुजारा बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. पुजाराचे वय सध्या 37 वर्ष आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 43.60च्या सरासरीने 7,195 धावा केल्या आहेत. पुजाराने कसोटीत 35 अर्धशतकांसह 19 शतके झळकावली आहेत. पण पुजाराचे वय पाहता आणि तो बऱ्याच दिवसापासून भारतीय संघातून बाहेर आहे. हे पाहता तो येणाऱ्या काळात लवकरच कसोटीतून निवृत्ती घेऊ शकतो.

2) अजिंक्य रहाणे- रहाणे बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने 2023 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आतापर्यंत रहाणेने 85 कसोटी सामन्यात 5,077 धावा केल्या आहेत. दरम्याने त्याने 26 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत. आता रहाणेची पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात निवड होते की नाही? हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल. रहाणे सध्या 36 वर्षाचा आहे. त्यामुळे तो सुद्धा लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो.

3) रवींद्र जडेजा- जडेजाने आपला शेवटचा कसोटी सामना याच वर्षी सिडनीमध्ये खेळला. 2012 मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या जडेजाने भारतासाठी आतापर्यंत 80 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 3,370 धावा केल्या आहेत. कसोटीतील जडेजाची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 175 आहे. दरम्यान त्याने कसोटीत 22 अर्धशतकांसह 4 शतके झळकावली आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये त्याने 323 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाचे वय सध्या 36 वर्ष आहे. हे पाहता तो लवकरच कसोटीतून निवृत्ती घेऊ शकतो.

4) इशांत शर्मा- इशांत शर्मा बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2021 ला खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याची कामगिरी चांगली रागिली आहे. त्याने कसोटीत 311 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. कसोटीत त्याची इकाॅनमी 3.15 आहे, तर त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 108 धावात 10 विकेट अशी आहे. त्याचे वय सध्या 36 वर्ष आहे. हे पाहता तो लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो.

5) भुवनेश्वर कुमार- भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाचा भाग नाही. त्याने 2018ला भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 2013 मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या भुवनेश्वरने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 28.9च्या सरासरीने 83 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 96 धावात 8 विकेट्स अशी आहे. पण त्याचे वय आता 35 वर्ष आहे. या सर्व गोष्टी पाहता भुवनेश्वर येणाऱ्या काळात लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---