भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बदलाचं वारं वाहत आहे. टी20 विश्वचषकानंतर संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाला. तसेच रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टी20 फॉरमॅटमध्ये कर्णधाराची जागाही रिक्त झाली आहे. यासाठी हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर होतं. तो संघाचा उपकर्णधारही होता, मात्र आता अचानक गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्याचा विचार करत आहेत. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगतो, जे सूर्यकुमार यादव कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधार होऊ शकतात.
ऋतुराज गायकवाड – ऋतुराज गायकवाडनं यापूर्वीही टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत तो संघाचा कर्णधार होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सुवर्णपदक जिंकलं होतं. सध्या तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. खुद्द महेंद्रसिंग धोनीनं त्याची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. अशा स्थितीत या पदासाठी ऋतुराजची दावेदारी मजबूत असेल.
संजू सॅमसन – संजू सॅमसन आयपीएलमध्ये दीर्घकाळापासून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ 2022 मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. तर आयपीएल 2024 मध्ये संघ तिसऱ्या स्थानी राहिला. सॅमसनला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. याचा संघाला फायदा होऊ शकतो.
जसप्रीत बुमराह – अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. तसेच तो टी20 मध्येही कर्णधार राहिला आहे. गेल्या वर्षी आयर्लंड दौऱ्यावर तो संघाचा कर्णधार होता. बुमराहला टीम इंडियामध्ये खूप आदर आहे. तो सर्व खेळाडूंचा आवडता आहे. तसेच टी20 क्रिकेटमधील त्याला दीर्घ अनुभव संघाला उपयोगी ठरू शकतो.
रिषभ पंत – दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. त्यानं टी20 मध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. कार अपघातापूर्वी तो भारताचा पुढील कर्णधार मानला जात होता, परंतु एका वर्षात बरेच काही बदललं. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आणि टी20 विश्वचषकातही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याची दावेदारी पुन्हा मजबूत झाली आहे.
शुबमन गिल – नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताची कमान सांभाळणारा शुबमन गिलही उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 5 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौऱ्याआधीच भारत-पाकिस्तान आमने-सामने…! पाहा कधी होणार सामना?
10 षटकात 250 धावा… दोघांनी ठोकली शतकं..!! अशी फलंदाजी स्वप्नातही पाहिली नसेल
धक्कादायक! प्रसिद्ध क्रिकेटरच्या घरावर दोन वेळा हल्ला, शेवटी सोडावे लागले घर