कोरोना व्हायरसमुळे 2021मध्ये बीसीसीआयने मोठे पाऊल टाकले होते. बोर्डाला पहिल्यांदाच दुसऱ्या दर्जाचा भारतीय संघ निवडावा लागला होता. खरं तर, मागील वर्षी विराट कोहली संघाचा कर्णधार होता. तसेच, तो इंग्लंडमध्ये कसोटी चॅम्पियनशिपनंतर इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकांच्या तयारीत व्यस्त होता. यादरम्यान भारताचा श्रीलंका दौराही होता. मात्र, क्वारंटाईन नियमामुळे खेळाडू इंग्लंडहून येऊन पुन्हा इंग्लंडला कसोटीसाठी जाऊ शतक नव्हते.
अशात बीसीसीआयने (BCCI) भारताचा ब संघ निवडला, ज्यात नवीन खेळाडूंचा समावेश होता. तसेच, हे सर्व खेळाडू युवा होता. संघाचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या हातात होते आणि प्रशिक्षक म्हणून निवडले गेलेले राहुल द्रविड (Rahul Dravid) त्यावेळी एनसीए प्रमुखही होते. द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली सर्व युवा खेळाडूंनी पदार्पण केले, परंतु त्यानंतरपासून आतापर्यंत त्यांना भारताच्या कोणत्याही दौऱ्यात निवडण्यात आले नाही. आता तर द्रविड भारताचे मुख्य प्रशिक्षकही बनले आहेत. यानंतरही ते या खेळाडूंकडे ढुंकूनही पाहत नाहीयेत. चला तर आज या लेखातून आपण अशा 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊया, ज्यांनी 2021मध्ये पदार्पण केले होते, परंतु त्यांना संधीच मिळत नाहीये.
देवदत्त पडिक्कल
या यादीत अव्वलस्थानी नाव येते ते देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याचे. पडिक्कल याने 28 जुलै, 2021 रोजी भारताकडून पदार्पण केले होते. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत पडिक्कल याला फक्त 2 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने एकूण 38 धावा चोपल्या होत्या. या दौऱ्यानंतर पडिक्कलला कधीही भारतीय संघात संधी मिळाली नाहीये. खरं तर, पडिक्कल सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असून त्याने 46 सामन्यात 1260 धावा चोपल्या आहेत.
कृष्णप्पा गौतम
यादीतील दुसरे नाव कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याचे आहे. गौतमने 23 जुलै, 2021 रोजी भारताकडून वनडे पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी फक्त वनडे क्रिकेटमध्येच पदार्पण केले आहे. त्याला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 1 विकेट घेण्यात यशही आले होते. ही विकेट मिनोद भानुका याची होती. मात्र, एक वनडे सामना खेळल्यानंतर त्याला आतापर्यंत भारतीय संघात निवडले गेले नाहीये.
चेतन सकारिया
चेतन सकारिया (Chetan Sakariya) याचाही या यादीत समावेश आहे. सकारिया याने मागील वर्षी 2021मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले होते. सकारिया हा आयपीएलमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. मात्र, अनेकांना माहिती नाहीये की, त्याने भारताकडूनही पदार्पण केले आहे. त्याने भारतासाठी 1 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने अनुक्रमे 2 आणि 1 विकेटही आपल्या नावावर केली आहे. सकारिया हा सन 2021मध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू होता.
संदीप वॉरियर
भारताकडून जास्त संधी न मिळालेल्या खेळाडूंमध्ये संदीप वॉरियर (Sandeep Warrier) याचाही समावेश आहे. संदीपने मागील वर्षी 2021मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले होते. वॉरियरने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगलीच वाहवा मिळवली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश मिळताना दिसत नाहीये. संदीपने भारताकडून 1 टी20 सामना खेळला आहे, परंतु त्याला एकही विकेट घेता आली नाहीये.
नितीश राणा
यादीतील शेवटचे नाव नितीश राणा (Nitish Rana) आहे. राणाने मागील वर्षी 2021मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. राणा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. दुसरीकडे, सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. राणाने भारताकडून 1 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने अनुक्रमे 7 आणि 15 धावा चोपल्या आहेत. मात्र, राणाचेही आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येत आहे. (5 players who for team india in 2021 now become anonymous see list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पाकिस्तानी अँकरने ओलांडली हद्द, लाईव्ह शोमध्ये वसीम अक्रमला म्हटले ‘नॅशनल धोबी’
‘असं’ झालं, तर भारत- न्यूझीलंड संघात रंगणार टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना, आयसीसीचा नियम घ्या जाणून