---Advertisement---

आपल्या षटकारांनी प्रेक्षकांना नेहमीच आभाळाकडे पाहायला लावणारे ५ धुरंधर; अव्वलस्थानी ‘हा’ पठ्ठ्या

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 4:58 PM
---Advertisement---

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगला ओळखले जाते. २० षटकांच्या या सामन्यांमध्ये चौकार- षटकारांची आतषबाजी नेहमीच पाहायला मिळते. खेळाडूही सर्वाधिक चौकार- षटकार आपल्या नावावर करण्यासाठी चांगलीच मेहनत घेत असतात. अशातच शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यानंतर सर्वाधिक षटकार ठोकणारे ५ अव्वल खेळाडू या हंगामात मिळाले आहेत.

आयपीएल २०२१ चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये झाला. या सामन्यात सीएसकेने २७ धावांनी विजय मिळवला. यासह सीएसकेने आयपीएल २०२१ चे विजेतेपद पटकावत चौथ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या हंगामात सीएसकेच्या खेळाडूंच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ३ खेळाडूंनी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या अव्वल ५ फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. या यादीत पंजाब किंग्सचा एक आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या प्रत्येकी एका खेळाडूचाच समावेश आहे.

आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान पंजाबचा कर्णधार केएल राहुलने पटकावला. त्याने या हंगामात २५ पेक्षाही अधिक गगनचुंबी षटकारांचा पाऊस पाडला.

या लेखातून आपण अशा ५ खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. चला तर मग सुरुवात करूया… (5 Players Who Hit Most Sixes In IPL 2021)

आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे ५ फलंदाज-

१. केएल राहुल- ३० षटकार (पंजाब किंग्स)
किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज केएल राहुलने यंदाचा हंगाम त्याच्या फलंदाजीने गाजवला. त्याने पंजाबकडून जवळपास सर्व सामन्यात मोठ्या धावा केल्या. त्याने या हंगामात ६२.६० च्या सरासरीने १३ सामन्यात ६२६ धावा केल्या. या धावा करताना त्याने सर्वाधिक ३० षटकारांचा पाऊस पाडला.

२. फाफ डू प्लेसिस- २३ षटकार (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिसने या हंगामात जबरदस्त फटकेबाजी केली. यासह तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने कठीण परिस्थितीत संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाची कामगिरी केली. या हंगामात त्याने १६ सामने खेळताना त्याने ४५.२१ च्या सरासरीने ६३३ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने २३ षटकार ठोकले.

३. ऋतुराज गायकवाड- २३ षटकार (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई सुपर किंग्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी कॅप) पटकावली. त्याने १६ सामने खेळताना ४३.३५ च्या सरासरीने ६३५ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने आपला संघसहकारी फाफ डू प्लेसिस इतकेच म्हणजे २३ षटकार मारले.

४. ग्लेन मॅक्सवेल- २१ षटकार (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने या हंगामात चांगली कामगिरी केली. त्याने १५ सामने खेळताना ४२.७५ च्या सरासरीने ५१३ धावा केल्या. मॅक्सवेलने बेंगलोर संघासाठी या हंगामात फायदेशीर ठरला. मागील हंगामात त्याने एकही षटकार ठोकला नव्हता. मात्र, या हंगामात त्याने तब्बल २१ षटकारांचा पाऊस पाडला.

५. मोईल अली- १९ षटकार (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई सुपर किंग्स संघाचा अनुभवी फलंदाज मोईन अलीने सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले. त्याने १५ सामने खेळताना २५.५० च्या सरासरीने ३५७ धावा केल्या. या धावा करताना त्याने १९ षटकारही ठोकले.

संबंधित बातम्या-

-जिथे जाऊ, तिथे आमचाच बोलबाला! आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे ५ खेळाडू

-आयपीएल २०२१ विजेत्या सीएसकेसाठी रनमशीन ठरलेत ‘हे’ ५ धुरंधर, पुणेकर ऋतुराजने तर कहरचं केलाय

-IPL 2021: फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह फाफ बनला सामनावीर, ‘हे’ आहेत याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---