---Advertisement---

नवा हंगाम, नवा विजेता! IPL 2022ला मिळाला ‘पर्पल कॅप’ विनर, ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज

On: रविवार, मे 29, 2022 11:46 PM
Wanindu-Hasaranga-And-Yuzvendra-Chahal
---Advertisement---

आयपीएल २०२२मधील अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना गुजरातने ७ विकेट्सने आपल्या खिशात घातला. यासह गुजरातने आयपीएलची पहिली वहिली ट्रॉफीही आपल्या नावावर केली. याबरोबरच यंदाच्या आयपीएलचा पर्पल कॅप विजेता खेळाडू मिळाला आहे. आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप मिळते.

यंदाच्या आयपीएल हंगामातील पर्पल कॅपचा मानकरी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ठरला आहे. या लेखातून आपण आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया… (5 Players Who takes Most wickets In 2022)

#आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

१. युझवेंद्र चहल- २७ विकेट्स, १७ सामने (राजस्थान रॉयल्स)
राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएल २०२२चा हंगाम गाजवला. त्याने आपल्या फिरकीने विरोधी संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. या हंगामात त्याने १७ सामन्यात गोलंदाजी करताना १९.५१च्या सरासरीने आणि ७.७५च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक २७ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची ४० धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

२. वनिंदू हसरंगा- २६ विकेट्स, १६ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यानेही या हंगामात आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला आहे. तो आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ सामने खेळताना १६.५३च्या सरासरीने तब्बल २६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या हंगामातील त्याची १८ धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

३. कागिसो रबाडा- २३ विकेट्स, १३ सामने (पंजाब किंग्स)
पंजाब किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यानेही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपल्या संघाला मौल्यवान विकेट्स मिळवून दिल्या आहेत. त्याने आतापर्यंत १३ सामने खेळताना १७.६५च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची ३४ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

४. उमरान मलिक- २२ विकेट्स, १४ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावले. तो या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा फलंदाजही बनला. त्याने १४ सामन्यात २०.१८च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची २५ धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

५. कुलदीप यादव- २१ विकेट्स, १४ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत १४ सामने खेळताना १९.९५च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची १४ धावा देत ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम

फक्त पंड्या अन् ‘या’ भारतीय कर्णधाराला जमलाय IPL Finalमध्ये विकेट घेण्याची किमया, वाचा सविस्तर

कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---