आज जवळजवळ सर्वच क्रिकेटपटू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले दिसतात. त्यातही ट्विटरवर निवृत्ती घेतलेले क्रिकेटपटू सर्वाधिक ऍक्टिव्ह असलेले पहायला मिळतात. या क्रिकेटपटूंबद्दल या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
निवृत्तीनंतर सर्वाधिक ट्विट करणारे ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटू –
विरेंद्र सेहवाग –
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग जसा क्रिकेट सामन्यात चौकार षटकार मारायचा तसाच तो ट्विटरवरही मारताना दिसतो. सेहवागने २०१५ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो आता समालोचन करताना दिसतो. त्यामुळे बऱ्याचदा तो ट्विटरवर ऍक्टिव्हही असतो.
तो नेहमीच खेळाडूंना अनोख्या पद्धतीने ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. तर कधी वेगवेगळ्या विषयांवर भाष्यही करतो. अनेकदा त्याच्या ट्विटरवरुन मेम्सही शेअर केले जातात. तसेच तो सणांच्याही शुभेच्छा देत असतो. आत्तापर्यंत त्याने ११ हजार ६०० हून अधिक ट्विट्स केले आहेत. तसेच त्याला २०.५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.
गौतम गंभीर –
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा उत्तर दिल्लीचा खासदार गौतम गंभीरनेही ट्विटरवर ऍक्टिव्ह असतो. तो देखील ट्विटरवर वेगवेगळ्या विषयांवर ट्विट करतो. यामध्ये तो खेळाडूंना शुभेच्छा देतो. तसेच सणांच्या शुभेच्छा देतो. याबरोबरच त्याचे अनेकदा ट्विटरवर वादही होतात. बऱ्याचदा त्याने केलेल्या ट्विट्समुळे तो ट्रोल झालेलाही पहायला मिळाला आहे.
तो अनेकदा क्रिकेटमधील एखाद्या विषयावर त्याचे स्पष्ट मतही ट्विटर मांडतो. तो राजकारणात सक्रिय असल्याने आणि भाजप पक्षाचा सदस्य असल्याने अनेकदा राजकारणाबद्दल तो ट्विट रिट्विट करतो. त्याच्या अनेक ट्विट्सच्या बातम्याही होतात. तसेच त्याला चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणात येतात.
डिसेंबर २०१८ ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या गंभीरने आत्तापर्यंत ३३७६ ट्विट्स केले आहेत. तसेच त्याला १०.४ मिलियन फॉलोवर्स ट्विटरवर आहेत.
वासिम जाफर –
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जाफरने मागील महिन्यात सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो ट्विटरवर बराच ऍक्टिव्ह असल्याचे पहायला मिळाला आहे. त्याने खेळाडूंबद्दल त्याची वैयक्तिक मते मांडली आहेत. तसेच त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम ११ जणांचा मुंबई संघही त्याने ट्विटरवर जाहीर केला.
त्याचबरोबर तो चाहत्यांना प्रश्न विचारताना, खेळाडूंना शुभेच्छाही देताना दिसला आहे. तसेच तो अनेक ट्विट रिट्विटही करतो. त्याच्या काही ट्विट्सच्याही मीडियाने बातम्या केल्या होत्या. २०१९ ला ट्विटर सुरु केलेल्या जाफरला ९९५५ फॉलोवर्स आहेत. त्याने आत्तापर्यंत ४३२ ट्विट्स केले आहेत.
सचिन तेंडुलकर –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे ट्विटरवर ऍक्टिव्ह असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४३५७ धावा करणारा सचिन ट्विटरवर अनेकदा सामाजिक संदेश देेत असतो. तसेच तो वेगवेगळ्या कल्पना वापरुन खेळाडूंना वाढदिवसाच्या शुभेच्छाही ट्विटरवर देत असतो.
त्याचबरोबर भारतीय संघाच्या कामगिरीबद्दलही तो प्रत्येकवेळी ट्विट करत असतो. त्याच्या ट्विट्सवर चाहत्यांबरोबर जगभरातील क्रिकेटपटूंच्याही प्रतिक्रिया येत असतात. एवढेच नाही तर सचिनही विविध खेळाडूंच्या ट्विट्सवर प्रतिक्रिया देत असतो. त्याच्या ट्विट्सवरही बऱ्याचशा बातम्या केल्या जातात.
विशेष म्हणजे ट्विटर नवीनच चालू झाले तेव्हा सर्वात आधी ट्विटरवर अकाऊंट काढणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सचिनही होता. त्याच्या ट्विटरमुळे त्याच्या अनेक चाहत्यांनीही ट्विटर अकाऊंट काढले होते. सचिनला आत्ता ट्विटरवर ३२.२ मिलियन फोलोवर्स आहेत. तसेच त्याने ३१९९ ट्विट आत्तापर्यंत केले आहेत.
बिशनसिंग बेदी –
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदीही ट्विटरवर बरेच ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या अकाऊंटवर बरेचसे ट्विट रिट्विट केलेले पहायला मिळतात. ते काही प्रेरणादायी वाक्य, फोटोवैगरे ट्विट करतात. तसेच ते विविध विषयांवरही मते मांडतात.
तसेच अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे तेही ट्विटरवरुन सणांच्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. त्यांनी क्रिकेटमधून १९७९ नंतर निवृत्ती घेतली. त्याकाळातील क्रिकेटपटूंमध्ये बेदी ट्विटरवर सर्वाधिक ऍक्टिव्ह असलेले पहायला मिळाले आहेत. त्यांना ट्विटरवर २३ हजारांहून अधिक ट्विट केले असून त्यांना ८७ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. (Retired cricketers who most active on Twitter)
ट्रेंडिंग घडामोडी –
एकाच स्टेडियमवर कसोटीत २ हजारपेक्षा जास्त धावा करणारे ५ खेळाडू
पदार्पणाच्या कसोटी सामन्यातचं दोन्ही डावात शतके करणारे २ खेळाडू
बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलबद्दल अखेर झाला मोठा निर्णय