ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.
या सामन्यात रोहित शर्माने अनेक विक्रम केले. त्यातील निवडक ५-
-रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक वेळा डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ९२ सामन्यात तब्बल २० वेळा असा पराक्रम केला आहे. तर विराट कोहलीने ६५ सामन्यात १९वेळा डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
-२२८८ धावांसह रोहित आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने हा टप्पा ९२ सामन्यांत पार केला. तर या यादीत विराट ६५ सामन्यातील २१६७ धावांसह चौथा आहे.
-आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये कर्णधार असताना रोहितने १४ सामन्यात १२ विजय तर केवळ २ पराभव पाहिले आहेत. तर विराट कोहलीने २० सामन्यात १२ विजय आणि ७ पराभव पाहिले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
-टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित १०२ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर ४८ षटकारांसह विराट ३३व्या स्थानी आहे.
-कर्णधार असताना रोहित शर्माने १४ टी२० सामन्यात ५१८ धावा केल्या आहेत तर विराटने टी२०मध्ये कर्णधार असताना २० सामन्यात ५१० धावा केल्या आहेत.
महत्त्वाची बातमी-
–तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती
–ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस