भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता, तर दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) या स्टेडिमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 113 धावांनी दारूण पराभव करत मालिका आपल्या खिशात घातली. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारताला घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी मालिका पराभूत करणाऱ्या संघाबद्दल जाणून घेऊया.
न्यूझीलंडने भारतावर दोन्ही सामन्यात शानदार विजय मिळवला. पण भारतीय संघाच्या नावावर एक चांगला रेकाॅर्ड होता तो रेकाॅर्ड तुटला. भारतीय संघाने घरच्या भूमीवर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली. टॉम लॅथमच्या (Tom Latham) नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने इतिहास रचला आणि पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकली. दोन्ही संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना (1 ते 5 नोव्हेंबर) दरम्यान मुंबई येथे खेळला जाणार आहे.
भारतात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणारे संघ-
इंग्लंड- (5 वेळा, शेवटचे 2012/13)
वेस्ट इंडीज- (5 वेळा, शेवटचे 1983/84)
ऑस्ट्रेलिया- (4 वेळा, 2004/05 मध्ये शेवटचे)
पाकिस्तान- (1 वेळा, 1986/87 मध्ये शेवटचे)
दक्षिण आफ्रिका- (1 वेळा, 1999/2000 मध्ये शेवटचे)
न्यूझीलंड- (1 वेळा, 2024 चालू कसोटी मालिका)
महत्त्वाच्या बातम्या-
“गौतम गंभीर लवकरच…” भारताच्या पराभवानंतर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
रोहित शर्मानंतर कोण बनणार भारतीय कसोटी संघाचा कर्णधार? हे 3 खेळाडू शर्यतीत
“हे शाळेतल्या मुलांप्रमाणे खेळतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं उडवली टीम इंडियाची खिल्ली