भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांची आज जयंती. १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईत या दिग्गजाचा जन्म झाला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३७ कसोटी सामने खेळले होते. या ३७ कसोटीत त्यांनी १ शतक आणि १४ अर्धशतकांसह ३१.०७ च्या सरासरीने २११३ धावा केल्या. तसेच ते २ वनडे सामनेही खेळले. या २ वनडे सामन्यात त्यांनी १ अर्धशतकासह ७३ धावा केल्या. याबरोबर त्यांनी २३७ प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात ४७.०३ च्या सरासरीने ३६ शतके आणि ८४ अर्धशतकांसह १५३८० धावा केल्या आणि २१ विकेट्सही घेतल्या आहेत.
अशा या भारताच्या दिग्गज माजी कर्णधाराबद्दल ह्या माहित नसलेल्या ५ गोष्टी-
१. वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा परदेशात कसोटी विजय मिळवला होता. १९७१ मध्ये भारताने इंग्लंड (१-०) आणि विंडीज (१-०) या देशात कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आजपर्यंत इंग्लंडमध्ये केवळ ३ कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
२. कोणताही कसोटी सामना जो संघ पराभूत होईल अशी परिस्थिती असताना तो अनिर्णित राखण्याची क्षमता वाडेकर यांच्यात होती. म्हणुन समकालिन क्रिकेटरपेक्षा ते बरेच वेगळे होते.
३. सुनिल गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, एस वेंगकटराघवन आणि बिशनसिंग बेदींसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधार अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
४. अजित वाडेकर हे भारताचे पहिले वनडे (मर्यादीत षटकांचे) कर्णधार होते.
५. वाडेकर कर्णधार असाताना भारतीय संघ २ वनडे सामने खेळला. दुर्दैवाने या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
६. वाडेकर हे केवळ तिसरे असे भारतीय खेळाडू होते ज्यांनी कर्णधार, टीम मॅनेजर आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणुन काम पाहिले होते. अन्य दोन खेळाडूंमध्ये लाला अमरनाथ आणि चंदु बोर्डे यांचा समावेश आहे.
अधिक वाचा –
– रिषभ पंतला मोठा झटका! चेन्नई विरुद्ध सुपर विजय मिळवूनही दिल्ली कॅपिटल्स संघासाठी वाईट बातमी । CSK Vs DC
– चेन्नईचा विजयी रथ दिल्लीनं रोखला! ऋषभ पंतच्या टीमनं नोंदवला IPL 2024 मधील पहिला विजय
– जबरदस्त ऋषभ! 4 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार…अपघातातून परतल्यानंतर ठोकलं पहिलं अर्धशतक