मँचेस्टर| इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात काल(२८ जुलै) पाचव्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी कारकिर्दीत ५०० विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला. याबद्दल आज भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याचे कौतुक केले आहे.
ब्रॉड ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार करणारा जगातील ७वा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. तसेच इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचाही दुसराच गोलंदाज ठरला.
ब्रॉडच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी युवराजने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. युवराजने पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘मला माहित आहे की मी प्रत्येकवेळी स्टुअर्ट ब्रॉडबद्दल काहीतरी लिहीले तरी लोक मी त्याला मारलेल्या ६ चेंडूतील ६ षटकाराशी संबंध लावतात. पण आज मी माझ्या सगळ्या चाहत्यांना विनंती करतो की आज त्याने जे यश मिळवले आहे त्याचे कौतुक करा. ५०० कसोटी विकेट्स हा काही विनोद नाही. त्यासाठी कित्येक वर्षांची मेहनत, समर्पण आणि दृढनिश्चय लागतो. ब्रॉड तू दिग्गज आहेस. तूला सलाम.’
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1288370088223989760
२००६ ला आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या ब्रॉडला युवराज सिंगने २००७ च्या टी२० विश्वचषकात ६ चेंडूत ६ षटकार लगावले होते. त्यावेळी ब्रॉड केवळ २१ वर्षांचा होता. पण स्टुअर्ट ब्रॉड तेव्हा खचला नाही.
त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि तो इंग्लंड संघाचा प्रमुख गोलंदाज बनला. विशेष म्हणजे २००७ च्या टी२० विश्वचषकावेळी स्टुअर्ट ब्रॉड एकही कसोटी सामना खेळला नव्हता, परंतु आज त्याच्या नावावर तब्बल १४० कसोटी सामने आहेत आणि ५०० विकेट्स आहेत. तसेच ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७३० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
#OnThisDay in 2007…@YUVSTRONG12 v @StuartBroad8.
6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣ ????
Six sixes in an over, and the fastest ever T20I fifty, off just 12 balls! ???? pic.twitter.com/xYylxlJ1b6
— ICC (@ICC) September 19, 2018
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २६९ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ३ सामन्यांची कसोटी मालिका यजमान इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली. इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटीतील विजयात स्टुअर्ट ब्रॉडने १० विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. ब्रॉडला या सामनावीराबरोबरच मालिकावीराचाही पुरस्कार मिळाला. या मालिकेत ब्रॉडने २ सामन्यांत मिळून १६ विकेट्स घेतल्या. तसेच ७३ धावाही केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर, तर रोहित आहे ‘या’ क्रमांकावर
आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…
‘रोहित शर्मा पुढचा एमएस धोनी आहे’, पहा कोण म्हणतयं
ट्रेंडिंग लेख –
आरसीबीने आयपीएलमध्ये केल्यात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा; पहा बाकी संघ आहेत कोणत्या क्रमांकावर





