पुणे, 21 ऑगस्ट 2017: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या सिध्देश पांडे, मुंबई उपनगरच्या शौर्य पेडणेकर, रायगडच्या स्वस्तिका घोष, ठाण्याच्या दिशा हुलावळे, मुंबई उपनगरच्या ओंकार तोरगळकर, सृष्टी हलंगडी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतयुथ(21 वर्षाखालील)मुलांच्या गटात अंतीम फेरीत ठाण्याच्या दुस-या मानांकीत सिध्देश पांडेने मुंबई शहरच्या अव्वल मानांकीत शुभम आंब्रेचा11,9 ,11/5, 9/11,11/8, 11/3 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. 19 वर्षीय सिध्देश हा सोमय्या महाविद्यालयात बीएमएसच्या व्दितिय वर्षाला शिकत असून ठाणे येथील बुस्टर क्लब येथे प्रशिक्षक शैलेजा गोहड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे. तर मुलींच्या गटात रायगडच्या बाराव्या मानांकीत स्वस्तिका घोषने ठाण्याच्या तिस-या मानांकीत श्रेया देशपांडेचा 8/11, 11/9, 11/9, 11/7, 9/11, 11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 14 वर्षीय स्वस्तिका ही रामशेट ठाकूर शाळेत नववी इयत्तेत शिकत असून खारघर टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक संदिप घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधी तिने गॉर्डन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.
ज्युनियर (18 वर्षाखालील) मुलांच्या गटात अंतीम फेरीत मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत शौर्य पेडणेकरने ठाण्याच्या दुस-या मानांकीत दिपीत पाटीलचा 14/12, 11/7, 9/11, 11/5, 12/10 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 17 वर्षीय शौर्य हा जमुनाबाई नर्सी इंटरनॅशनल स्कुलमध्ये 12वी इयत्तेत शिकत असून वायएमसीए येथे प्रशिक्षक अॅरीक फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे. तर मुलींच्यागटात ठाण्याच्या दुस-या मानांकीत दिशा हुलावळेने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सृष्टी हलंगडीचा 6/11, 11/7, 13/11, 4/11, 11/8, 11/9, असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 17 वर्षीय दिशा ही फादर अॅग्नेल महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावी इयत्तेत शिकत असून फादर अॅग्नेल अकादमी येथे चैतन्य उदाने आणि सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तीचे हे या गटातील पहिलेच विजेतेपद आहे.
पुरूष गटात मुंबई उपनगरच्या बिगर मानांकीत ओंकार तोरगळकरने ठाण्याच्या अव्वल मानांकीत सिध्देश पांडेला पराभवाचा 11/5, 11/7, 15/13, 12/10 असा धक्का देत विजेतेपद पटकावले. तर महिलांच्या गटात मुंबई उपनगरच्या सातव्या मानांकीत सृष्टी हलंगडीने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत दिव्या महाजनचा 11/9, 8/11, 6/11, 11/9, 11/7, 9/11, 12/10 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. सृष्टी ही पोदार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावी इयत्तेत शिकत असून दहिसर पीपीएस येथे प्रशिक्षक तरूण गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तीचे या वर्षातील हे तीसरे विजेतेपद आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण बी.यू भंडारी मर्सिडीज बेंझचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतूल कळूसकर आणि नामदेव शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू डॉ.मंदिरा ठीगळे-बसक, सिंबायोसीस विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. एस.एस.ठीगळे, पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव श्रीराम कोणकर, स्पर्धा संचालक राजेश शेलार, एम्स फीनप्रोचे जतिन माळी, सिग्मा वन लॅडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक कपिल गांधी, व्हेरीयंट नेटवर्क प्रोडक्शनचे विक्रम गुर्जर, आदि मान्यवर उपस्थित होते. राहूल क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी- युथ गट(21 वर्षाखालील)मुले
शुभम आंब्रे(मुंबई शहर,1) वि.वि रेगन ए(मुंबई उपनगर, 5) 11/5,11/5,9/11,11/8,11/13,11/8
सिध्देश पांडे(ठाणे, 2) वि.वि रविंद्र कोटीयन(मुंबई उपनगर, 3) 11/8, 11/3, 11/5, 11/9
अंतीम फेरी-सिध्देश पांडे(ठाणे, 2) वि.वि शुभम आंब्रे(मुंबई शहर,1) 11,9 ,11/5, 9/11,11/8, 11/3
मुली- स्वस्तिका घोष(रायगड,12) वि.वि सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,1) 11/9,11/9,11/7, 5/11, 11/7
श्रेया देशपांडे(ठाणे,3) वि.वि अश्लेशा त्रेहान(मुंबई उपनगर, 2) 11/3,11/9,7/11,11/8,7/11, 6/11,11/9
अंतिम फेरी- स्वस्तिका घोष(रायगड,12) वि.वि श्रेया देशपांडे(ठाणे,3) 8/11, 11/9, 11/9, 11/7, 9/11, 11/4
ज्युनियर गट(18 वर्षाखालील) मुले- उपांत्य फेरी
शौर्य पेडणेकर(मुंबई उपनगर, 1) वि.वि मानव मेहता(मुंबई उपनगर)11/8, 9/11,11/7, 5/11, 11/6,11/6
दिपीत पाटील(ठाणे, 2) वि.वि रेगन ए(मुंबई उपनगर, 3) 11/9, 5/11, 2/11, 11/6, 11/7, 11/9
अंतिम फेरी-शौर्य पेडणेकर(मुंबई उपनगर, 1) वि.वि दिपीत पाटील(ठाणे, 2) 14/12, 11/7, 9/11, 11/5, 12/10
मुली- सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,1) वि.वि श्रेया देशपांडे(ठाणे, 4) 11/9, 11/8, 11/9, 11/9
दिशा हुलावळे(ठाणे, 2) वि.वि स्वस्तिका घोष (रायगड,6) 9/11, 11/5, 11/8, 9/11, 11/6, 11/7
अंतिम फेरी- दिशा हुलावळे(ठाणे, 2) वि.वि सृष्टी हेलंगडी(मुंबई उपनगर,1) 6/11, 11/7, 13/11, 4/11, 11/8, 11/9,
पुरूष गट- उपांत्य फेरी
सिध्देश पांडे(ठाणे, 1) वि.वि युगंध झेंडे(ठाणे, 5) 11/4, 11/6, 11/9, 7/11, 11/3
ओंकार तोरगळकर(मुंबई उपनगर) वि.वि रविंद्र कोटीयन(मुंबई उपनगर,3)11/3,11/4,7/11,11/13,11/9, 4/11,11/9
अंतिम फेरी- ओंकार तोरगळकर(मुंबई उपनगर) वि.वि सिध्देश पांडे(ठाणे, 1) 11/5, 11/7, 15/13, 12/10
महिला गट- उपांत्य फेरी
दिव्या महाजन(मुंबई उपनगर,1) वि.वि ममता प्रभु(मुंबई उपनगर) 9/11,11/7,16/14, 7/11, 11/7, 11/7
सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,7) वि.वि अश्लेशा त्रेहान(मुंबई उपनगर,6) 11/9,11/2,11/8,11/6
अंतिम फेरी- सृष्टी हलंगडी(मुंबई उपनगर,7) वि.वि दिव्या महाजन(मुंबई उपनगर,1) 11/9, 8/11, 6/11, 11/9, 11/7, 9/11, 12/10