6 Players Test Debut for India in 2023: सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. विशेष म्हणजे, हा कसोटी सामना एका भारतीय खेळाडूसाठी खास ठरला आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून प्रसिद्ध कृष्णा आहे. कृष्णाने या सामन्यातून भारतासाठी कसोटी पदार्पण केले आहे. मात्र, त्याच्यासोबत असे एकूण 6 नशीबवान भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना 2023मध्ये कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. चला तर, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात…
सन 2023मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण करणारे खेळाडू-
1. केएस भरत (विरुद्ध- ऑस्ट्रेलिया)
भारतासाठी 2023मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharat) अव्वलस्थानी आहे. त्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात त्याने 8 धावांची खेळी केली होती. तसेच, एका फलंदाजाला यष्टीचीत पद्धतीने बाद केले होते. भरतने पदार्पणानंतर आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले.
2. सूर्यकुमार यादव (विरुद्ध- ऑस्ट्रेलिया)
यादीत दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असून त्यानेही फेब्रुवारीमध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातूनच कसोटी पदार्पण केले होते. टी20चा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या सूर्याला पहिल्या सामन्यात भरतप्रमाणेच 8 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला होता. सूर्याने पदार्पणानंतर एकही कसोटी सामना खेळला नाहीये.
3. इशान किशन (विरुद्ध- वेस्ट इंडिज)
यावर्षी भारताकडून कसोटी पदार्पण करणारा तिसरा खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) होय. इशानने जुलैमध्ये रोझो येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. इशान या सामन्यात नाबाद राहिला होता. त्याने 20 चेंडूंचा सामना करताना फक्त 1 धाव काढली होती. पदार्पणानंतर त्याने भारताकडून एकूण 2 कसोटी सामने खेळले.
4. यशस्वी जयसवाल (विरुद्ध- वेस्ट इंडिज)
भारतासाठी यावर्षी कसोटीत पदार्पण करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणजे 21 वर्षीय यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) होय. यशस्वीनेही इशानसोबतच जुलैमध्ये रोझो येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याच्यासाठी पदार्पणाचा कसोटी सामना खूपच खास ठरला होता. त्याने पदार्पणाच्या कसोटीत सलामीला फलंदाजी करताना 171 धावांची दीडशतकी खेळी केली होती. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या सामन्यात भारताने 141 धावांनी विजय मिळवला होता. त्यानेही भारताकडून आतापर्यंत फक्त 2 कसोटी सामने खेळले आहेत. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळत आहे.
5. मुकेश कुमार (विरुद्ध- वेस्ट इंडिज)
मुकेश कुमार (Mukesh Kumar) हा वेगवान गोलंदाज भारताकडून 2023 मध्ये कसोटी पदार्पण करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने जुलैमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात मुकेशने 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर मुकेश कुमार कसोटी सामना खेळला नाहीये.
6. प्रसिद्ध कृष्णा (विरुद्ध- दक्षिण आफ्रिका)
सन 2023मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणारा सहावा खेळाडू म्हणजे प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) होय. प्रसिद्धला सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. या सामन्यात तो कशाप्रकारे गोलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (6 cricketers who make their Test debut for India In 2023)
हेही वाचा-
INDvsSA 1st Test: यजमानांनी टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतासाठी कृष्णाचे पदार्पण; जड्डू बाहेर
INDvsSA पहिल्या कसोटीपूर्वी इरफान पठाणने निवडली Playing 11, मॅचविनर खेळाडूलाच केले संघातून बाहेर