मुंबई । नुकतेच एमएस धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना चकित केले, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सुरेश रैनाने वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. सुरेश रैनाने आपला मित्र धोनीसह सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला. पण असेही काही क्रिकेटर्स आहेत जसे वय जास्त झाले असूनही निवृत्त होण्यास तयार नाहीत. त्यात भारताचे आणि पाकिस्तानचे दोन खेळाडू आहेत तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीजच्या एका खेळाडूचा समावेश आहेत.
भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंग 40 वर्षांचा आहे, गेल्या 4 वर्षांपासून त्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही परंतू तरीही तो निवृत्त झालेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप घेण्याची वेळ अजून आली नसल्याचे हरभजनला वाटते. हरभजन सिंगने 2007 मध्ये टी -20 विश्वचषकआणि 2011 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या ऑफस्पिनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 711 बळी घेतले होते. मात्र, हरभजन कधी सेवानिवृत्त होईल, हे अद्याप कळलेले नाही.
भारताचा आणखी एक ज्येष्ठ खेळाडू पार्थिव पटेलही आता 35 वर्षांचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येणे त्याला अशक्य आहे. पार्थिव गेली 9 वर्षे वनडे आणि 8 वर्ष टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. परंतु आतापर्यंत त्यांनी सेवानिवृत्तीची घोषणा केलेली नाही.
पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिकचीही अशीच परिस्थिती आहे. 1999 मध्ये पदार्पण करणारा शोएब आता 38 वर्षांचा झाला आहे, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही कार्यरत आहे. सध्या तो इंग्लंड दौर्यावर मलिक 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळण्यासाठी गेला आहे. मलिकने पाकिस्तानकडून 35 कसोटी, 287 वनडे आणि 113 टी -20 सामने खेळला आहे.
पाकिस्तानचा आणखी एक अष्टपैलू मोहम्मद हाफिज आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा मोह संपत नाही. हाफिज 39 वर्षांचा आहे पण आतापर्यंत तो टी -20 आंतरराष्ट्रीय खेळत आहे. हाफिज सध्या इंग्लंडच्या दौर्यावर असून तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत खेळताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिर 40 वर्षांचा आहे. परंतु त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नाही. 2019 च्या विश्वचषकानंतर ताहिरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु अद्यापही दक्षिण आफ्रिकेसाठी टी -20 क्रिकेट खेळायचे आहे. सन 2021 मध्ये होणारा टी -20 विश्वचषक खेळणे हा ताहिरचा उद्देश आहे.
वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ख्रिस गेल 40 वर्षांचा आहे. पण तो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. गेल 2019 च्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देईल असे वाटत होते पण तसे झाले नाही. गेलला अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे. गेल 21 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.






