fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू

6 famous players who part mumbai indians but never played game

September 21, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Facebook/mumbaiindians

Photo Courtesy: Facebook/mumbaiindians


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. भारतात कोविड -१९ साथीच्या वाढत्या घटनांमुळे यावर्षी संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे.

मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये विजेतेपद जिंकले आहे. आयपीएलच्या या १२ वर्षांच्या इतिहासात बऱ्याच मोठ्या खेळाडूंनी मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, सनथ जयसूर्या सारख्या महान खेळाडूंचादेखील समावेश आहे. या कालावधीत असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांना मुंबईने लिलावात आपल्या संघात खरेदी करूनही एकाही सामन्यात संधी दिली नाही.

आजच्या या खास लेखात आपण अशा ६ खेळाडूंबद्दल चर्चा करूया, ज्यांना मुंबई इंडियन्स संघाने मोठी रक्कम देऊन खरेदी करूनही एक देखील सामना खेळण्याची संधी दिली नाही. जाणून घेऊया कोण कोण आहेत ते ६ स्टार खेळाडू.

६. जोश हेझलवुड

ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याला मुंबई संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. खरं तर, आयपीएल २०११ मध्ये, मुंबई इंडियन्सने या युवा खेळाडूला त्यांच्या संघामध्ये समाविष्ट केले. मागील मोसमातही तो मुंबईच्या संघात होता. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

आयपीएल २०२० मध्ये जोश हेजलवुडला चेन्नईने लिलावाद्वारे २ कोटींमध्ये खरेदी केले आहे. चेन्नईला चांगल्या गोलंदाजीचा पर्याय हवा होता आणि त्यांना हा एक चांगला खेळाडू मिळाला आहे. परंतु आयपीएल २०२० मध्ये त्याला चेन्नई संघाकडूनही पहिला सामना खेळू शकला नाही.

 ५. कॉलिन मुनरो

न्यूझीलंडचा तुफानी सलामीवीर कॉलिन मुनरो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०१६ मध्ये जोश हेजलवुडच्या जागी मुनरोचा संघात समावेश करण्यात आला होता. त्या हंगामात मुनरोला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती कारण म्हणजे संघात आधीपासूनच उत्कृष्ट परदेशी खेळाडूंची उपस्थिती होती.

आयपीएलमध्ये मुनरोने आतापर्यंत केवळ १३ सामने खेळले आहेत. परंतु त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. या १३ सामन्यांत त्याने १४.७५ च्या सरासरीने आणि १२५.३३ च्या स्ट्राइक रेटने १७७ धावा केल्या आहेत. या हंगामाच्या लिलावापूर्वी दिल्लीच्या कॅपिटलने मुनरोला सोडले. जरी आयपीएलमध्ये मुनरोची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही, परंतु तो असा एक खेळाडू आहे ज्याच्याकडे एकहाती सामने जिंकविण्याची क्षमता आहे.

४. निकोलस पुराण

इंडियन प्रीमियर लीगच्या २०१७ च्या हंगामात आयपीएल जिंकणार्‍या मुंबई संघाचा भाग असणारा दुसरा परदेशी खेळाडू म्हणजे निकोलस पुराण. तो वेस्ट इंडीयाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज आहे, त्या हंगामात त्याला आपली कौशल्य दाखवण्याची संधीही मिळाली नाही कारण मुंबई इंडियन्सने पार्थिव पटेलचा यष्टिरक्षक म्हणून वापर केला. या कारणास्तव, या काळात पूरणला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

२०१९ च्या आयपीएलच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने निकोलस पूरनचा ४.२ कोटी रुपये देऊन संघात समावेश केला होता. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या  निकोलस पूरणमध्ये वेगवान धावा करण्याची क्षमता असून ते सहजपणे मोठे षटकार ठोकू शकतो. मागील हंगामात त्याने १५७ चा प्रभावी स्ट्राइक रेटने धावा केल्या. आयपीएल २०२० मध्ये पंजाब संघाला या खेळाडूकडून मोठ्या आशा असतील.

३. फिलिप ह्यूजेस

ऑस्ट्रेलियाचा माजी प्रतिभावान सलामीवीर फिलिप ह्यूजेसचा मृत्यू क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट क्षणांपैकी एक होता. फिलिप ह्यूजेस हा मुंबई संघात होता. जेव्हा मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१३ चा हंगाम जिंकला, तेव्हा तो मुंबई संघाचा भाग होता.

मात्र, त्याला कधीही खेळण्याची संधी मिळाली नाही. या कारणास्तव, आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत या खेळाडूची एकही धाव नाही. या खेळाडूने ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरी केली आहे.

२. कुलदीप यादव

कुलदीप यादव हा भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. २०१२ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये कुलदीप यादवदेखील मुंबई इंडियन्सचा एक भाग होता, परंतु त्या हंगामात त्याला एका सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर हा खेळाडू कोलकाता नाईट रायडर्समध्ये दाखल झाला.

केकेआरचा प्रमुख फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय स्तरावर हॅटट्रिक विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादव हा एक जबरदस्त गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ४० सामन्यांत ३९ बळी घेतले आहेत. परंतु मागील हंगाम त्याच्यासाठी चांगला नव्हता.

परंतु युएईच्या अटी पाहता ते जोरदार पुनरागमन करू शकतो. मागील हंगामात केलेल्या खराब कामगिरीमुळे ते या हंगामात जबरदस्त कामगिरी करण्यास उत्सुक असेल.

१. अ‍ॅलेक्स हेल्स

इंग्लंडचा ३० वर्षीय फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्स याला टी-२० मधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गणला जातो. २०१५ मध्ये अलेक्स हेल्सला मुंबईकडून आयपीएलचा पहिला ब्रेक मिळाला होता. कोरी अँडरसनच्या जागी त्यांची निवड झाली. परंतु ८ संघ व्यवस्थापनाने अनुभवी खेळाडू लेंडल सिमन्सला सतत संधी दिल्या, ज्यामुळे अ‍ॅलेक्सला या दरम्यान खेळण्याची संधी मिळाली नाही.

२०२० च्या आवृत्तीसाठी हेल्सला लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही. अ‍ॅलेक्स हेल्सची आधारभूत किंमत दीड कोटी रुपये होती. अ‍ॅलेक्स हेल्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द शानदार राहिली आहे.


Previous Post

भारतीय क्रिकेट वर्तुळात सर्वाधिक चर्चा होत असलेल्या रवी बिश्नोईचे झाले आयपीएल पदार्पण

Next Post

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

Related Posts

Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून

Photo Courtesy: Twitter/IPL

दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण; आणखी एक मोठा खेळाडू झाला जखमी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.