भारताची आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आॅस्ट्रेलियामधील आर्ची शिलर, या 6 वर्षाच्या चिमुकल्याचा आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आॅस्ट्रेलियाच्या संघात समावेश केला आहे.
झाले असे की आर्चीला हृदयविकार आहे. ज्यामुळे त्याला अनेक शस्त्रक्रियांना समोरे जावे लागले आहे. तो जेव्हा फक्त तीन महिन्याचा होता तेव्हा त्याच्या हृदयाच्या वॉल्वमध्ये दोष असल्याचे समोर आले. ज्यामुळे त्याचे अनियमित हृदयाचे ठोके पडत होते. त्यामुळे त्याच्यावर योग्यवेळी उपचाराची गरज होती. याच कारणामुळे वेळोवेळी त्याच्यावर अनेक शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या.
आर्ची हा दिग्गज माजी लेग स्पीनर शेन वॉर्नला आदर्श मानतो. काही दिवसांपूर्वी त्याला आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याकडून मेक ए विश या फाउंडेशनच्या मदतीने व्हिडिओ कॉल करण्यात आला. त्यावेळी त्याला आॅस्ट्रेलियन संघातील त्याच्या समावेशाबद्दल सांगण्यात आले.
त्याच्यासाठी हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. त्या कॉलच्या वेळी त्याचे पालकही त्याच्या बरोबर होते. पण लँगर यांनी त्याला अंतिम 11 मध्ये स्थानाची कोणतीही खात्री दिली नाही. पण तरीही त्याच्यासाठी आॅस्ट्रेलियन संघात समावेश हीच आनंदाची गोष्ट आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1069531298467729409
आर्ची जेव्हा अॅडलेड ओव्हल मैदानावर आला तेव्हा त्याला त्याची आॅस्ट्रेलियाची जर्सी देण्यात आली. तसेच त्याने संघाबरोबर सरावातही भाग घेतला होता. त्याचबरोबर आर्चीने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही बाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1069728467099369472
आर्ची हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 डिसेंबरपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठीही आॅस्ट्रेलियन संघाचा भाग असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयपीएल २०१९च्या लिलावासाठी या शहरावर झाले शिक्कामोर्तब
–भारत विरुद्धच्या सामन्याआधी या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बसला मोठा धक्का
–मिताली राजच्या अडचणीत वाढ; कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधनाने केला मोठा खूलासा






