यापूर्वी वनडे विश्वचषक स्पर्धांचे 12 हंगाम पार पडले. मात्र, या हंगामांमध्ये खूप जास्त षटकारांची बरसात पाहायला मिळाली नाही. परंतु विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम बनला. हा विक्रम, बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या उपांत्य सामन्यात रचला गेला.
विश्वचषक 2023 मधील विक्रम
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात खास विक्रम रचला गेला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी केलेल्या षटकारांच्या आतिषबाजीमुळे हा विश्वचषक विक्रमाचा ठरला. या सामन्यात स्पर्धेतील 600 षटकारांचा टप्पा पार झाला. यामुळे कुठल्याही विश्वचषकात न घडलेला विक्रम विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत घडला.
तब्बल 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात विश्वचषक 2023 हा एकमेव हंगाम ठरला, ज्यामध्ये 600 हून अधिक षटकारांची बरसात झाली. विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत 2015 चा विश्वचषक दुसऱ्या स्थानी आहे. यामध्ये 463 षटकार मारले गेले होते. त्यापूर्वी 2007च्या विश्वचषकात 373 षटकार मारले गेले होते. तसेच, मागील विश्वचषकात म्हणजेच 2019 विश्वचषकातील षटकारांची संख्या फक्त 357 होती. (Most sixes in a World Cup edition see list)
विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार
600 षटकार – विश्वचषक 2023*
463 षटकार- विश्वचषक 2015
373 षटकार- विश्वचषक 2007
357 षटकार- विश्वचषक 2019
सामन्यातील इतर विक्रम
-रोहितचे सर्वाधिक षटकार
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यात 29 चेंडूत 47 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याने हे षटकार मारताच तो विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 51 षटकार मारले आहेत. तसेच, तो एका हंगामात सर्वाधिक 28 षटकार मारणाराही फलंदाज बनला.
-विराट कोहलीच्या सर्वाधिक 686 धावा
विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर होता. त्याने 673 धावा केल्या होत्या. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने या सामन्यात सचिनचा विक्रम मोडीत काढला. विराटने नाबाद 92 धावांवर खेळताना स्पर्धेत 686 धावांचा टप्पा गाठला.
हेही वाचा-
विराटने 20 वर्षानंतर बदलला इतिहास! मिळवला World Cup मधील सर्वात यशस्वी फलंदाजाचा बहुमान
वीर विराट! बनला वनडेतील तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज, विश्वविजेत्या कर्णधाराचे आकडे पडले फिके