भारताचा दमदार माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ४००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने अनेक सामन्यात अविस्मरणीय खेळीदेखील केली आहे.
२०००मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करत युवराजने एकूण ११७७८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १७ शतकांचा आणि ७१ अर्धशकांचा समावेश आहे. युवराज त्याच्या कारकिर्दीदरम्यान अनेक खेळाडूंसोबत खेळला आहे. मात्र, असेही काही खेळाडू आहेत ज्यांच्यासोबत युवराज खेळला आहे, पण त्यांची नावे खूप कमी जणांना माहित आहेत.
जाणून घेऊयात त्या 7 भारतीय खेळाडूंविषयी 7 Indian Players Whom With Yuvraj Singh Played International Matches
१. वेनुगोपाल राव
भारताचा माजी क्रिकेटपटू वेनुगोपाल राव याने भारताकडून फक्त १६ सामने खेळले आहेत. यात त्याने २४.२२च्या सरासरीने २१८ धावा केल्या होत्या. रावने ३० जुलै २००५ला श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. यावेळी युवराज सिंगही भारतीय संघाचा भाग होता. त्या एकाच सामन्यात युवराज आणि राव सोबत होते. युवराजने या सामन्यात ३३ चेंडूत १२ धावा केल्या होत्या. तर, रावने या सामन्यात ७४ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या.
त्यानंतर रावने खेळलेल्या १६ पैकी १५ वनडेत हे दोघे संघसहकारी होते. मे २००६मध्ये रावने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात युवराज भारतीय संघाचा भाग नव्हता.
२. आकाश चोप्रा
भारताचा प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने त्याच्या कारकिर्दीत फक्त १० कसोटी सामने खेळले होते. यात त्याने २३च्या सरासरीने २ अर्धशतकांच्या मदतीने ४३७ धावा केल्या होत्या. चोप्राने ऑक्टोबर २००३मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटा सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेतील दुसरा सामना १६ ऑक्टोबरला मोहाली येथे झाला होता. या सामन्यात युवराजने त्याचे कसोटी पदार्पण केल्यामुळे तो आणि चोप्रा दोघेही पहिल्यांदा सोबत खेळले होते.
या सामन्यात चोप्राने सलामीला पलंदाजी करत ६० धावा केल्या होत्या. तर, युवराज फक्त २० धावांवर बाद झाला होता. ऑक्टोबर २००४मध्ये चोप्राने त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. चोप्राच्या १० पैकी ४ सामन्यात युवराज त्याचा संघसहकारी होता.
३. अविष्कार साळवी
आविष्कार साळवीने भारताकडून फक्त ४ वनडे सामने खेळले होते. यात त्याने ३०च्या सरासरीने ४ विकेट्स घेतल्या होत्या. ११ एप्रिल २००३ला साळवीने बांग्लादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. या सामन्यातच युवराज सिंगही भारतीय संघाचा भाग होता. त्या सामन्यात त्याने नाबाद १०२ धावांची शतकी खेली केली होती. हे युवराजचे वनडेतील पहिले शतक होते.
साळवीने या सामन्यात ७ षटके गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या होत्या. साळवीने त्याचा शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर २००३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात युवराज संघाचा भाग होता. साळवीने खेळलेल्या ४ पैकी २ सामन्यात युवराज त्याचा संघसहकारी होता.
४. अभिषेक नायर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायर याने भारताकडून फक्त ३ सामने खेळले आहेत. ३ जुलै २००९ला नायरने वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा पहिला वनडे सामना खेळला होता. याच सामन्यात युवराजही भारतीय संघाचा भाग होता. त्याने या सामन्यात फक्त २ धावा घेतल्या होत्या. नायरला या सामन्यात फलंदाजी करायची संधी मिळाली नव्हती. नायरने त्याचा शेवटचा वनडे सामना सप्टेंबर २००९ला खेळला होता. या सामन्यात युवराज दुखापतीमुळे संघाबाहेर होता. हे दोघे एकत्र २ वनडे सामने खेळले.
५. परवेज रसूल
भारताचा माजी फिरकी गोलंदाज परवेज रसूल याने भारताकडून फक्त १ वनडे आणि १ टी२० सामना खेळला आहे. यावेळी त्याने वनडेत २ आणि टी२० त १ विकेट घेतली होती. रसूलने जून २०१४मधील बाांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. तर, जानेवारी २०१७मध्ये त्याने इंग्ंडविरुद्धच्या टी२० त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या सामन्यात युवराजही भारतीय संघाचा भाग होता. या सामन्यात सूलने १ विकेट घेतली होती. तर, युवराज या सामन्यात १२ धावांवर बाद झाला होता. ते एकत्र खेळलेले हा एकमेव सामना आहे.
६. मोहित शर्मा
२०१५सालच्या विश्वचषकात दमदार प्रदर्शन करणारा मोहित शर्मा हा भारताकडून २६ वनडे आणि ८ टी२० खेळू शकला होता. मोहितने त्याच्या कारकिर्दीत वनडेत ३१ तर टी२०त ६ विकेट्स घेतल्या होत्या. ऑगस्ट २०१३मधे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून मोहितने भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१३मध्ये विशाखपट्टणम येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोहित आणि युवराज भारतीय संघाचा भाग होते. या सामन्यात मोहितने १ विकेट घेतली होती तर युवराजने २८ धावा केल्या होत्या. ३ टी२० व ३ वनडे सामने एकत्र खेळले.
७. केएल राहुल
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने २०१४मध्ये त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने भारताकडून ३६ कसोटी सामने, ३२ वनडे आणि ४२ टी२० सामने खेळले आहेत. राहुलने जानेवारी २०१७मध्ये युवराजसोबत त्याच्या कारकिर्दीतील पहिला सामना खेळला होता. तो वनडे सामना पुणे येथे इंग्लंडिवरुद्ध झाला होता. तेव्हापासून राहुल आणि युवराजने ३ वनडे आणि ३ टी२० सामने एकत्र खेळले आहेत. तसेच हे सर्व सामने इंग्लंड दौऱ्यावर खेळले आहेत. केएल राहुल हे आता क्रिकेटमधील एक मोठे नाव झाले आहेत. परंतु हे दोन खेळाडू एकत्र खूपच कमी सामने खेळले.
ट्रेंडिंग लेख-
वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय…
८ वर्षांपुर्वीच्या डेक्कन चार्जर्स व सध्याच्या सनराइजर्स हैद्राबादमधील…
भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता