fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…

Most Ducks By Indian Players In ODI

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दशहत कोणत्या संघाची असेल, तर ती आहे भारतीय संघाची. भारताने १९८३ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिले वनडे विश्वचषक पटकावले. तर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०११मध्ये दुसऱ्यांदा वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले.

तसेच, सचिन तेंडुलकर हा वनडेत सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. तर, वनडेत सर्वाधिक शतके ठोकणारा सचिन (४९) हा पहिला तर, विराट कोहली (४३) दुसरा फलंदाज आहे.

ज्याप्रमाणे वनडेत शतक करणे ही अभिमानाची गोष्ट समजली जाते. तसेच, वनडेत शून्यावर बाद होणे हीदेखील खूप लाजिरवाणी गोष्ट समजली जाते. आजवर वनडेत अनेक खेळाडू शून्यावर बाद झाले आहेत.

सर्वाधिक वेळा वनडेत शून्यावर बाद होणाऱ्या पहिल्या १६ खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूचे नाव नाही. असे असले तरी, भारतीय संघातील १५ खेळाडू आजपर्यंत १०पेक्षा जास्तवेळा वनडेत शून्यावर बाद झाले आहेत. तर, ३ खेळाडू हे १०वेळा वनडेत शून्यावर बाद झाले आहेत.

तर जाणून घेऊयात, वनडेत १०पेक्षा जास्तवेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांविषयी

१. सचिन तेंडुलकर – ४६३ सामने, २०वेळा शून्यावर बाद

२. जवागल श्रीनाथ – २२९ सामने, १९ वेळा शून्यावर बाद

३. अनिल कुंबळे – २६९ सामने, १८ वेळा शून्यावर बाद

४. युवराज सिंग – ३०१ सामने, १८वेळा शून्यावर बाद

५. हरभजन सिंग – २३४ सामने, १७ वेळा शून्यावर बाद

६. सौरव गांगुली – ३०८ सामने, १६ वेळा शून्यावर बाद

७. झहीर खान – १९४ सामने, १४ वेळा शून्यावर बाद

८. सुरेश रैना – २२६ सामने, १४ वेळा शून्यावर बाद

९. विरेंद्र सेहवाग – २४१ सामने, १४ वेळा शून्यावर बाद

१०. कपिल देव – २२५ सामने, १३ वेळा शून्यावर बाद

११. रोहित शर्मा – २२४ सामने, १३ वेळा शून्यावर बाद

१२. विराट कोहली – २४८ सामने, १३ वेळा शून्यावर बाद

१३. राहुल द्रविड – ३४० सामने, १३ वेळा शून्यावर बाद

१४. गौतम गंभीर – १४७ सामने, ११ वेळा शून्यावर बाद

१५. कृष्णमचारी श्रीकांत – १४६ सामने, ११ वेळा शून्यावर बाद

तर, अजित आगरकर, अजय जडेजा आणि एमएस धोनी हे त्यांच्या वनडे कारकिर्दीत १० वेळा शून्यावर बाद झाले आहेत. 

ट्रेंडिंग लेख- 

८ वर्षांपुर्वीच्या डेक्कन चार्जर्स व सध्याच्या सनराइजर्स हैद्राबादमधील ५ गमतीशीर साम्य

भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता

विश्वास नाही बसणार पण हे खरंय; जगातील ‘या’ १० महान गोलंदाजांनी कारकिर्दीत एकही…

You might also like