टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. धोनी आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. माहीनं पत्नी साक्षीसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
महेंद्रसिंह धोनी हा केवळ भारतीय क्रिकेटमधीलच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं प्रत्येक आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. आज धोनीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या काही विक्रमांबद्दल सांगतो. धोनीनं त्याच्या कारकिर्दीत कोणती मोठी कामगिरी केली? त्यानं टीम इंडियाला तीनही आयसीसी ट्रॉफी एक-एक करून कशा जिंकवून दिल्या? हे जाणून घेऊया.
(1) महेंद्रसिंह धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्यानं तीनही आयसीसी ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्या आहेत.
(2) धोनी हा टी20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला कर्णधार आहे. त्यानं 2007 मध्ये ही कामगिरी केली होती.
(3) एमएस धोनीनं 2010 मध्ये पहिल्यांदा आयसीसी टेस्ट मेस जिंकली.
(4) 2010 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेनं पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद जिंकलं.
(5) 2010 मध्येच चेन्नईनं चॅम्पियन्स लीग टी20 चं विजेतेपद जिंकलं.
(6) एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. टीम इंडियानं 28 वर्षांनंतर विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं.
(7) धोनीनं 2011 मध्ये दुसऱ्यांदा आयसीसी टेस्ट मेस जिंकली.
(8) धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं आयपीएल 2011 चं विजेतेपद जिंकलं.
(9) एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
(10) एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग टी20 चं विजेतेपद पटकावलं.
(11) धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2016 मध्ये आशिया कप जिंकला.
(12) सीएसकेनं धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2018, आयपीएल 2021 आणि आयपीएल 2023 चं विजेतेपद जिंकलं.
(13) एमएस धोनीला पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाची नाचक्की! दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव
टी20 विश्वचषक ट्रॉफी कोणत्या धातूची बनली असते? ट्रॉफीचं वजन किती असतं? जाणून घ्या सर्वकाही
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ! अवघ्या काही क्षणांत अख्खं स्टेडियम हाऊसफुल्ल