---Advertisement---

आयपीएल पदार्पणासाठी ‘हे’ सात खेळाडू आहेत सज्ज; १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात झालेत सामील

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 7:54 PM
---Advertisement---

भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१चा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यूएईमध्ये १ सप्टेंबरपासून या हंगामातील उर्वरित सामने खेळण्याची तयारी केली जात आहे, ज्यामुळे सर्व फ्रँचायझी त्यांच्या बहुतेक खेळाडूंसह तेथे पोहोचल्या आहेत.

सर्व क्रिकेट चाहते हंगाम पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, यावेळी पहिल्या भागात सहभाग घेतलेल्या अनेक परदेशी खेळाडूंनी दुखापती किंवा वैयक्तिक कारणांमुळे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे संघांनी इतर अनेक खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतले आहे, जे पहिल्यांदाच या सर्वात मोठ्या टी२० लीगचा भाग बनणार आहेत. जाणुन घेऊ या सविस्तर माहिती त्या सात खेळाडूंबद्दल.

७. टीम डेविड
सिंगापूरमध्ये जन्मलेला अष्टपैलू टीम डेविड आयपीएलमध्ये खेळणारा आपल्या देशातील पहिला खेळाडू ठरेल. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सामील केले आहे, जो न्यूझीलंड खेळाडू फिन ऍलनची संघात जागा घेईल. यापूर्वी टीम डेविडने बिग बॅश लीगमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे.

६. वनिंदू हसरंगा
श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर वनिंदू हसरंगा, जो भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याला आयपीएलमध्ये प्रथमच खेळण्याची संधी मिळाली आहे. तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एक भाग बनला आहे.

५. नॅथन एलिस
बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिक घेणारा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला पंजाब किंग्ज संघाने आपल्या संघात घेतले आहे. तो संघात त्याचाच देशाचा सहकारी राइली मेरेडिथची जागा घेईल.

४. ग्लेन फिलिप्स
राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलच्या दुसऱ्या भागात त्याच्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. या भागात तो न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्सला आपल्या संघात सामील केले आहे. तो द हंड्रेडच्या पहिल्या सत्रात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता.

३. आदिल रशीद
इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा फिरकी गोलंदाज म्हणून दीर्घकाळ खेळत असलेला लेगस्पिनर आदिल रशीदला पहिल्यांदाच जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याला पंजाब किंग्जने आपल्या संघाने सामील केले आहे.

२ आकाश दीप
या वेगवान गोलंदाजाला जखमी खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या संघात स्थान दिले आहे. आकाश दीप गेल्या दोन वर्षांपासून आरसीबी संघासाठी (नेट बॉलर ) गोलंदाज म्हणून जोडलेला होता, त्यानंतर त्याला प्रथमच संघाने अधिकृतपणे संघाशी जोडले आहे.

१ जॉर्ज गार्टन
इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टन याने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही, तरीही त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. गार्टनला आरसीबी संघाने सामील केले आहे आणि द हंड्रेडसह टी२० ब्लास्टमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याला हा करार मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नडला त्याला तोडला! पुजाराला डोळे दाखवणाऱ्या ओव्हरटनचा उमेश यादवने ‘असा’ घेतला बदला

कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

“तिरंगा देशाची शान”, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याबद्दल गावसकरांनी भारतीय चाहत्यांना सुनावले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---