इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत २-१ ची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीनंतर अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. परंतु, माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर स्टेडियममध्ये प्रेक्षकांद्वारे केलेल्या एका कृत्यामुळे भलतेच नाखुश दिसून आले आहेत.
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. त्यांनी समालोचन करत असताना इशारा केला की, काही प्रेक्षक तिरंग्याच्या अपमान करत आहेत. तसेच माजी भारतीय कर्णधारांनी अशा प्रेक्षकांना विशेष मागणी देखील केली.
तर झाले असे की, सामना सुरू असताना काही प्रेक्षकांनी भारतीय तिरंगा फडकावला. ज्यावर ‘वी ब्लिड ब्लू’ असे लिहिले होते. ज्यावर सुनील गावसकर यांनी संतांपजनक प्रतिक्रीया देत लिहिले की, “तुम्ही कितीही मोठे चाहते असले, तरी तिरंग्याचा अपमान होऊ देऊ नका. तो जसा आहे तसाच राहू द्या.”(Sunil Gavaskar slams a section of Indian fans for defacing the national flag)
We Bleed Blue. Written on Indian National Flag by some fans on the ground.
Sunil Gavaskar on air: No matter how big a fan you are, do not deface the national flag.
That is how it has been, that is how it should remain.
— Manjitsingh (@busy_mann) September 6, 2021
Sunil Gavaskar: "I don't think the National flag should be defaced."
Couldn't agree more.
There are a million other better ways to show your love for the country.#ENGvIND #SunilGavaskar #India#England— Saurav Chakraborty (@saurav_MUFC_98) September 6, 2021
तसेच ते पुढे म्हणाले की, “जे प्रशंसक भारताचा झेंडा घेऊन मैदानात जातात, त्यांनी झेंड्याची विशेष काळजी घ्यायला हवी. सामना पाहण्यासाठी झेंडा घेऊन जाण्यास काहीच हरकत नाही. परंतु, त्या झेंड्यावर काही लिहू नका. असे अनेक चाहते आहेत, जे खेळाडूंचा उत्साह वाढवण्याच्या नादात भान हरपतात. त्यांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे की, तिरंगा हा आपल्या देशाची शान आहे. ते एखादे नाव किंवा संदेश देण्यासाठीचे साधन नाही. जो कोणी तिरंगा घेऊन येईल, त्याने त्यावर काहीच लिहू नये आणि कोणालाही लिहू देऊ नये.”
महत्त्वाच्या बातम्या –
विजयाचा आनंद अन् जल्लोष! ड्रेसिंग रुममध्ये परतताना कशा होत्या भारतीय खेळाडूंच्या भावना, पाहा व्हिडिओ
पाकिस्तानी वंशाच्या ‘या’ यष्टीरक्षकावर आयसीसीची मोठी कारवाई, घातली ४ वर्षांची बंदी






