मंगळवारी(२९ सप्टेंबर) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले होते. ह्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १४७ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबादने या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवला. हा हैदराबादचा या आयपीएल हंगामातील पहिला विजय होता.
हैदराबादच्या या विजयात त्यांच्या गोलंदाजांनी महत्त्वाचे योगदान दिले. हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या; तर भुवनेश्वर कुमारने २ आणि टी नटराजन व खलील अहमदने प्रत्येकी १ विकेट घेतली. या दरम्यान नटराजनने अनेकांना त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
त्याने या सामन्यादरम्यान ४ षटके गोलंदाजी करताना तब्बल ७ यॉर्कर चेंडू टाकले. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधील एका सामन्यात एका गोलंदाजाने टाकलेले हे सर्वाधिक यॉर्कर चेंडू आहेत.
T. Natarajan appreciation post 👏🧡#DCvSRH #OrangeArmy #KeepRising #IPL2020 pic.twitter.com/srnXIR6U6j
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 29, 2020
तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या नटराजनने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना मंगळवारी दिल्लीविरुद्ध ४ षटकात केवळ २५ धावा दिल्या. याबरोबरच मार्कस स्टॉयनिसची महत्त्वाची विकेटही घेतली. स्टॉयनिसला त्याने यॉर्कर चेंडू टाकूनच पायचीत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून सेरेना विल्यम्सची माघार
विराटनंतर आता ‘या’ कर्णधाराला बसला मोठा झटका; भरावे लागले तब्बल १२ लाख!
ज्याने इतकी वर्षे आयपीएल गाजवली, त्याचेच नाव सीएसकेने वेबसाईटवरून टाकले काढून
ट्रेंडिंग लेख –
चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएलमधील ‘या’ ५ दिग्गज खेळाडूंचा फायदा घेण्यात त्यांचे संघ ठरले अपयशी