जागतिक क्रिकेटमध्ये अनेक टी-२० क्रिकेट लीग खेळल्या जातात. परंतु आतापर्यंत भारताच्या इंडियन प्रीमियर लीग या टी-२० स्पर्धेमुळे नवख्या खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले. आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली आणि तेव्हापासून या स्पर्धेमध्ये देशी-विदेशी खेळाडू खेळताना दिसतात. ज्यामध्ये अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे.
आयपीएलमधील काही खेळाडूंचा संघांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांना नियमित संधी दिल्याने त्यांचा फायदा संघांना झाला.
परंतु असे काही खेळाडू आहेत ज्यांची क्षमता आणि कौशल्य तसेच अनुभवात काही कमी नव्हती. तरीही संघांना त्यांना पाहिजे तशी संधी देता आली नाही. त्या खेळाडूंचा फायदा संघांना करून घेता आला नाही. या लेखात तुम्हाला आयपीएलच्या इतिहासातील अशा ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा आयपीएलमधील संघांनी योग्य वापर केला नाही.
जॉर्ज बेली
ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील काही खेळाडूंची कामगिरी खूपच जबरदस्त होती. त्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याचेही नाव येते. जॉर्ज बेली याने तीनही स्वरूपात स्वत: ला सिद्ध केले.
बेली आयपीएलमध्येही काही वर्षे खेळला असून, त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबला त्याच्या नेतृत्वात अंतिम फेरी गाठून दिली होती. परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान. जॉर्ज बेली हा मधल्या फळीतील जबरदस्त फलंदाज आहे. पण आयपीएलमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. बेली २०१५ पासून या स्पर्धेमध्ये दिसला नाही. तो आयपीएलमध्ये केवळ ४० सामने खेळू शकला. यात त्याने ६६३ धावा केल्या.
केन विल्यमसन
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन याचे नाव सध्या खूप मोठे आहे. केन विल्यमसन हा सध्याच्या अव्वल ४ फलंदाजांमध्ये येतो. त्याने प्रत्येक प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडकडून टी-२० क्रिकेटमध्येही त्याने शानदार कामगिरी केली आहे. या कारणास्तव, बर्याच टी-२० क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने तिथेही आपली छाप सोडली.
आयपीएलमध्ये केन विल्यमसन सारख्या खेळाडूकडे तितकेसे लक्ष दिले गेले नाही. केनने संधी मिळताच आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी बजावली आहे, परंतु नियमित फलंदाज म्हणून त्याला कधी संधी दिली गेली नाही. केनने २०१८ मध्ये आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळाला. त्या हंगामात त्याने आपली क्षमता दर्शविली होती. तो त्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच त्याने त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाला अंतिम सामन्यात देखील पोहचवले होते.
परंतु आयपीएसमध्ये अंतिम ११ जणांच्या संघात केवळ ४ परदेशी खेळाडू घेण्याची परवानगी असल्याने, याचा अनेकदा विलियम्सनला फटका बसला आहे. या नियमामुळेच अनेकदा त्याला संघाबाहेर बसावे लागते.
ओएन मॉर्गन
इंग्लंड क्रिकेट संघाला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार इयोन मॉर्गन यांचे क्रिकेट विश्वात मोठे नाव आहे. मॉर्गनने गेल्या वर्षी आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. कर्णधार मॉर्गन हा एक जबरदस्त फलंदाज आहे. जो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ताबडतोड फलंदाजी करतो.
टी-२० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये मॉर्गनने स्वतःला सिद्ध केले आहे.आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मॉर्गनने जबरदस्त कामगिरी केली आहे. मॉर्गन जगभरात खेळल्या जाणार्या बर्याच टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळतो. परंतु आयपीएलमध्ये त्याचा योग्य वापर झाला नाही
तो सध्या आयपीएलमधील केकेआर संघाकडून खेळत आहे. परंतु त्याने २०१५ आणि २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. तसेच २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडूनही खेळला. त्याने आत्तापर्यंत केवळ आयपीएलमध्ये 54 सामने खेळले आहेत.
फाफ डू प्लेसिस
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस हा एक स्फोटक फलंदाज आहे. फाफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही स्वरूपात स्वतःला सिद्ध केले आहे. फाफने दक्षिण आफ्रिकेसाठी बराच काळ टी-२० खेळले आहे. त्याला गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून नियमित खेळण्याची संधी मिळत आहे.
त्याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळत असताना त्याला बर्याच वेळा बाहेर बसावे लागले आहे. जेव्हा जेव्हा या फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा त्याने अप्रतिम डाव खेळला आहे. त्याला देखील विलियम्सनप्रमाणे अंतिम ११ मध्ये ४ परदेशी खेळाडूंनाच संधी देण्याच्या नियमाचा याबाबतीत फटका बसला आहे.
त्याने २०१२ पासून आतापर्यंत फक्त ७४ सामने खेळे आहेत, त्यात त्याने १४ अर्धशतकांच्या मदतीने २०२६ धावा केल्या आहेत. यंदाच्या १३ व्या हंगामात त्याने ३ सामन्यात १७३ धावा करताना २ अर्धशतक ठोकले आहेत.
तिलकरत्ने दिलशान
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान हा जागतिक दर्जाचा मोठा फलंदाज होता. तिलकरत्ने दिलशानने आपल्या फलंदाजीमुळे नाव कमावले. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पण आयपीएलमध्ये खेळण्यास दिलशानला फारच कमी संधी मिळाली. दिलशानने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि आरसीबीकडून एकूण ६ हंगाम खेळला. त्याने ५२ आयपीएल सामन्यात ११५३ धावा केल्या. त्यात त्याच्या ९ अर्धशतकांचा समावेश आहे.