क्रिकेटमध्ये बहुतेक खेळाडू 35 ते 40 या वयानंतर खेळामधून निवृत्ती घेतात. पण वेस्ट इंडीजचे असे एक वेगवान गोलंदाज आहेत जे विव रिचर्ड्स, गॅरी सोबर्स, फ्रँक वॉरेल अशा दिग्गज क्रिकेटपटूंच्या काळापासून खेळत असून आता त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या वेगवान गोलंदाजाचे नाव आहे सेसिल राईट.
राईट यांनी जमैकाकडून बार्बाडोस विरुद्ध 1959 ला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. यावेळी या सामन्यात बार्बाडोसकडून सोबर्स, वेस हॉल यांसारखे दिग्गज खेळले होते. यानंतर राईट इंग्लंडला गेले. तिथे ते सेंट्रल लँकाशायर लीगमध्ये क्रॉम्पटॉनकडून व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून खेळले. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले
राईट यांनी 60 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 7000 पेक्षाही जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आता अखेर त्यांनी निवृत्ती घेण्याचा विचार केला असून पुढील दोन आठवड्यात ते निवृत्ती घेतील.
त्यांनी द डेली मिररशी बोलताना सांगितले की ‘मी इतकी वर्षे खेळण्याचे कारण मला महिती हवे होते. मी तूम्हाला ते सांगू शकत नाही.’
तसेच राईट यांनी त्यांच्या फिटनेसचे श्रेय लँकाशायरच्या पारंपारिक भोजनाला दिले आहे. ते म्हणाले, ‘खरं सांगू मी काहीही खातो. पण मी जास्त दारु पित नाही. फक्त कधीतरी बीयर घेतो.’
त्याचबरोबर ते म्हणाले, ‘मी स्वत:ला फिट ठेवले आहे कारण ट्रेनिंगला न जाण्यासाठी मी कधी माझ्या वयाचे कारण पुढे केले नाही. मी अनुभवले आहे की स्वत:ला सक्रिय ठेवल्याने वेदना कमी होण्यास मदत होते.’
‘मला एका जागेवर बसून टीव्ही पहायला आवडत नाही. त्याऐवजी मी चालायला जातो.’
राईट 7 सप्टेंबरला त्यांचा शेवटचा सामना खेळणार आहेत. ते पेन्नील लीगमध्ये अप्परमीलकडून स्प्रिंगहेड विरुद्ध हा सामना खेळतील.
https://www.facebook.com/uppermillcc/photos/a.784432464989396/2364716166961010/?type=3&theater
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे विंडीजचा संघ
–वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी
–भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतिक्षेत