सिडनी। आज( 25 नोव्हेंबर) आॅस्ट्रलिया विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक करत महत्त्वाचा वाटा उचलला.
विराटने या सामन्यात 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. याच यादीत रोहित दुसऱ्या स्थानी आहे.
रोहितने केला खास विक्रम-
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ९० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा रोहित केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी शोएब मलिक (१०८), शाहिद आफ्रिदी (९९) आणि एमएस धोनी (९३) यांनी ९०पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
रोहितने ९० टी२० सामन्यात ३२.८९च्या सरासरीने २२३७ धावा केल्या आहेत. टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसरा आहे.
महिला क्रिकेटपटूंमध्ये १४ खेळाडूंनी ९० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहे. त्यात हरमनप्रीत कौर (९३) ही एकमेव भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग कोहलीने मोडला ब्रेंडन मॅक्यूलमचा विक्रम, शोएब मलिकचाही विक्रम आहे धोक्यात
–रोहित शर्माच्या ‘विराट’ विश्वविक्रमाशी कर्णधार कोहलीने केली बरोबरी
–विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा आॅस्ट्रलियावर 6 विकेट्सने विजय
–हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’