---Advertisement---

INDvsSA | तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी दिल्लीकर चाहते उत्सुक, इतक्या तिकिटांची विक्री

On: मंगळवार, जून 7, 2022 5:58 PM
KL Rahul And Temba Bavuma
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आता या सामन्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने म्हणजेच डीडीसीएने याविषयी माहिती दिली आहे की, सामन्याचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त तिकिट विकले गेले आहेत.

मागच्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक अडचणी आल्या. याच कारणास्तव दिल्लीमध्ये मोठ्या काळापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाहीये. आता अशात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका दिल्लीतून सुरू होणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

याआधी डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली म्हणाले होते की, मैदानात येणाऱ्या प्रेक्षकांना निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. चाहते मालिकेतील या पहिल्या सामन्यासाठी खूपच उत्सुक आहेत, ज्यामुळे तिकिटे झटपट विकली गेली आहेत. डीडीसीएसचे सचिव राजन मनचंदाने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “९४ टक्के तिकिटे आधीच विकले गेले आहेत. आता केवळ ४०-५०० तिकिटे विकायचे राहिले आहेत.”

ते पुढे म्हणाले होते की, “सर्व गरजेच्या निर्बंधांचे पालन केले जात आहे. कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादले गेले नसले तरी, आम्ही लोकांना याचे पालन करायला लावणार आहोत. आधीच सावध राहणे गरजेचे आहे. स्टेडियम सामन्यासाठी तयार आहे आणि आम्ही चाहत्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. पहिल्या टी-२० सामन्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येत येण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकी संघ आधीच याठिकाणी आला आहे आणि ते वातावरणासोबत ताळमेळ बसवत आहेत. दिल्ली क्रिकेटसाठी हा खूप रोमांचक प्रसंग आहे.”

दिल्लीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०१९ मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारतासमोर बांगलादेशचे आव्हान होते. तेव्हापासून दिल्लीतील चाहत्यांना एकही आंतरराष्ट्रीय सामना स्टेडियममध्ये पाहता आला नाहीये. याच पार्श्वभूमीवार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी स्टेडियम खचाखच भरलेले असणार, हे मात्र नक्की. बीसीसीआयने आधीच माहिती दिली आहे की, या मालिकेदरम्यान खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या बायो बबलचे पालन करावे लागणार नाही. या निर्णय खेळाडूंसाठी महत्वाचा असणार आहे. दोन वर्षांनंतर ही पहिली मालिका असेल, ज्यामध्ये खेळाडूंना बायो बबलचे पालन करायचे नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

शतक एक विक्रम अनेक! रणजी ट्रॉफीत सरफराजने रचला इतिहास, थेट डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत झाला सामील

पहिला सामना गमावल्याचं दु:ख सावरतानाच न्यूझीलंडला बसला दुसरा धक्का, ‘हा’ धुरंधर मालिकेतून बाहेर

रिषभ पंत यष्टीरक्षक फलंदाज बनण्यामागे ‘या’ व्यक्तीचा हात, दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी स्वत:च केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---