आर्सेनल फुटबॉल क्लबचे मेनेजर आरसेन वेंगर यांनी नवीन २ वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केली. ते पुढील दोन वर्ष क्लब चे मेनेजर असतील.या सीज़न नंतर त्यांचा करार संपणार असे चित्र तयार करण्यात आले होते. ते मेनेजर म्हणून राहणार की पदावरून पायउतार होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
१९९६ पासून वेन्गर आर्सेनल संघाच्या मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. २२ वर्षाच्या कारकीर्दमध्ये त्यांनी ३ वेळा आर्सेनल क्लबला इंग्लीश प्रिमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे, पण २००४-०५ च्या मोसमानंतर त्यांना ई.पी.ल.चे विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या वर्षी आर्सेनल ई.पी.ल.मध्ये पाचव्या स्थानावर आहेत.
याच कारणांमुळे त्यांचा पायउतार होणार असे वाटत होते पण काही दिवसांपूर्वी एफ.ए.कप जिंकल्यामुळे आर्सेनल क्लबने त्यांना मॅनेजर पदावर कायम ठेवले. मागील चार वर्षात सलग तिसर्यांदा एफ ए कप आर्सेनलने जिंकला. विक्रमी १३ व्या वेळेस तर वेन्गर मॅनेजर असताना ७ व्या वेळेस जिंकला आहे.
मॅनेजरपदी वेंगर असणार हा निर्णय जाहीर झाल्यावर आर्सेनल समर्थकांच्या मिश्र प्रतिक्रीया समोर आल्या तर काही समर्थक एमीरात स्टेडियम बाहेर जाहीर विरोध करत घोषणाबाजी करताना दिसले.
आर्सेनल संघासमोरील मुख्य आव्हाने-
१ – इंग्लीश प्रिमियर लीगचे विजेतेपद मिळवणे
२- मेसट ओझील आणि आलेक्स सांचेज़ यांचे करार
३- काही ओवररेटेड खेळाडूंचे करार समाप्त करणे आणि त्यांना संघातून कमी करने.
४- नविन पण चांगल्या खेळाडूंचा संघात समावेश करून घेणे.