माजी भारतीय वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याची 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लंका प्रिमियर लीग 2020 च्या हंगामासाठी कॅंडी टस्कर्स संघात निवड झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याने कॅंडी टस्कर्स संघ घेतला आहे. 37 वर्षीय मुनाफ एलपीएलमध्ये भारतीय संघातील माजी सहकारी इरफान पठाणबरोबर खेळताना दिसणार आहे.
एलपीएलने मंगळवारी आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, “भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याने कॅंडी टस्कर्सशी करार केला आहे.”
बदली खेळाडू म्हणून झाली मुनाफची निवड
कॅंडी टस्कर्स संघात वेगवान गोलंदाज म्हणून पाकिस्तानचा वहाब रियाज आणि इंग्लंडच्या लियाम प्लंकेटची निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी काही कारणाअभावी माघार घेतल्याने पाकिस्तानकडून सोहेल तन्वीर, तर भारताच्या मुनाफ पटेलची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. मुनाफ प्रथमच एलपीएल स्पर्धेत खेळणार आहे.
पहिलाच सामना कॅंडी टस्कर्सचा
यापूर्वी 28 ऑगस्टपासून एलपीएल स्पर्धा सुरु होणार होती. मात्र, ही स्पर्धा कोरोनामुळे लांबणीवर पडली. आता ही स्पर्धा 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने हंबनटोटा येथे होणार आहेत. 26 नोव्हेंबरला स्पर्धेचा पहिला सामना कॅंडी टस्कर्स विरुद्ध कोलंबो किंग्ज संघात होणार आहे.
मुनाफ पटेलने आयपीएल स्पर्धेत 63 सामन्यांत 74 बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स संघासाठी तो प्रत्येकी 3 वर्षे खेळला आहे, तर 2017 मध्ये तो शेवटचा गुजरात लायन्समध्ये दिसला होता.
याव्यतिरिक्त भारतीय संघाकडून त्याने 13 कसोटी सामने, 70 वनडे आणि तीन 3 टी-20 सामने खेळले आहेत. मुनाफ 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या-
इरफान पठाण ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या संघाकडून खेळणार क्रिकेट, तेही भारतात नाही तर…
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह
विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी