भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 मालिका खेळत आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धची मायदेशातील मालिका संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रवाना झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर लगेचच चार दिवसांच्या अंतराने न्यूझीलंड दौरा सुरु झाल्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयवर टीका केली होती.
याबद्दल आता सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नियुक्त केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीओए) माजी सदस्या डायना एडुलजी यांनी विराटवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की विराटनेच 2017मध्ये हे वेळापत्रक मान्य केले होते.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एडुलजी म्हणाल्या, ‘विराट आत्ता याबद्दल तक्रार करतोय, ही गोष्ट विचित्र आहे. मला वाटते तो खूप क्रिकेट खेळला आहे की आता तो हेच विसरला की त्यानेच हे वेळापत्रक मान्य केले होते. आम्ही खेळाडूंवर कोणताही दबाव टाकलेला नाही. त्यांना माहित होते की ते न्यूझीलंडला तीन दिवस आधी (टी20 मालिकेच्या) जाणार आहेत. खेळाडूंच्या सहमतीनेच या वेळापत्रकासाठी मान्यता देण्यात आली होती.’
एडुलजी पुढे म्हणाला, ‘आम्ही खेळाडूंना त्यांना काही बदल हवे आहेत का, हे विचारले होते. त्यानुसारच आम्ही भविष्यातील वेळापत्रकाला(फ्युचर टूर प्रोग्राम) मान्यता दिली होती.’
एडुलजी यांनी अशीही माहिती दिली की भारतीय संघाचे ऑगस्ट 2018 ते जुलै 2013 दरम्यानचे फ्युचर टूर प्रोग्राम बीसीसीआय सीइओ राहुल जोहरी आणि क्रिकेट प्रशासन प्रमुख गौरव सक्सेना यांनी तयार केले होते. हा प्रोग्राम खेळाडूंबरोबर झालेल्या बैठकीतही सादर करण्यात आला होता. त्यानंतर या फ्युचर टूर प्रोग्रामला अंतिम मान्यता देण्यात आली होती.
30 नोव्हेंबर 2017 मध्ये दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलमध्ये विराट कोहली, एमएस धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या उपस्थितीत क्रिकेट अधिकाऱ्याबरोबर झालेल्या बैठकित या फ्युचर टूर प्रोग्रामला मान्यता देण्यात आली होती.
विराटने न्यूझीलंड विरुद्धची टी20 मालिका खेळण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बीसीसीआयवर टीका करताना म्हटले होते की आता भारतीय संघ थेट स्टेडियममध्ये लँड करेल आणि सामना खेळेल.
यापूर्वी सीओए प्रमुख अमिताभ चौधरी यांनीही विराटवर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की विराटने याबद्दल आधी बीसीसीआयशी चर्चा करायला हवी होती.
चौथ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियात झाले ३ बदल, रोहितसह या खेळाडूंना विश्रांती
वाचा👉https://t.co/uSFEBixy6p👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020
…म्हणून केन विलियम्सन खेळणार नाही आज होणारा चौथा टी20 सामना
वाचा👉https://t.co/z9AguAF0gf👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND #KaneWilliamson— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020