भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका गुरुवारी संपली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारतीय संघाने 106 धावांच्या अंतराने नावावर केला. जोहान्सबर्गमघ्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली.
दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण आफ्रिकी संघ अवघ्या 13.5 षटकांमध्ये 95 धावा करून सर्वबाद झाला. फिरकीपटू कुलदीप यादव याचे कौतुक करावे तितके कमीच ठरेल. कारण कुलदीपने अवघ्या 2.5 षटकांमध्ये 17 धावा खर्चकरून 5 विकेट्स नावावर केल्या. रविंद्र जडेजा याच्या फिरकीत देखील दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू अडकले. मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. डेविड मिलर याने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 35 धावांची खेळी केली.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 201 धावांची खेळी केली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव याने 56 चेंडूत 100, तर सलामीवीर यशस्वी जयसवाल याने 41 चेंडूत 60 धावांची खेली केली. केशव महाराज आणि लिझाद विल्यम्स यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
उभय संघातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकने, तर तिसरा सामना गुरुवारी भारताने जिंकला. परिणामी मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटली. सूर्यकुमार यादव आणि ऍडन मार्करम यांनी मालिका विजयाची ट्रॉफी देखील दोघांमध्ये स्वीकारली. (SA vs IND T20i Series Trophy is shared between Aiden Markram and Suryakumar Yadav)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर.
भारत: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, जितेश शर्मा (व), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । निर्णयाक सामन्याची नाणेफेक भारताच्या विरोधात! यजमान संघात दोन महत्वाचे बदल
कुलदीप यादवच्या वाढदिवसानिमित्त चहलने व्हिडिओ शेअर करत मागितली माफी; म्हणाला, ‘याच्यासाठी…’