मँचेस्टर। आज (27 जून) 2019 क्रिकेट विश्वचषकात 34 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमांची नोंद झाली आहे.
विराटने आज 55 चेंडूत त्याचे वनडे कारकिर्दीतील 53 वे अर्धशतक केले. याबरोबरच हे विराटचे या विश्वचषकातील सलग चौथे अर्धशतक आहे.
त्यामुळे तो विश्वचषकात सलग चार डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. तर जगातील एकूण तिसरा कर्णधार ठरला आहे.
याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने 2007 च्या विश्वचषकात तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने विराट प्रमाणेच 2019 च्या विश्वचषकात सलग 4 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
याबरोबरच विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या नवज्योत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाचीही विराटने बरोबरी केली आहे.
सिद्धू यांनी 1987 च्या विश्वचषकात सलग चार डावात 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. तर सचिनने 1996 आणि 2003 या दोन्ही विश्वचषकात सलग चार डावात 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती.
विराटने आजच्या सामन्याआधी या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान विरुद्ध अनुक्रमे 82, 77 आणि 67 धावांच्या अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
#विश्वचषकात सर्वात सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे कर्णधार –
4 – ग्रॅमी स्मिथ – 2007
4 – ऍरॉन फिंच – 2019*
4 – विराट कोहली – 2019*
#विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
4 – नवज्योत सिंग सिद्धू – 1987
4- सचिन तेंडुलकर – 1996
4 – सचिन तेंडुलकर – 2003
4 – विराट कोहली – 2019*
3 – मोहम्मद अझरुद्दीन – 1992
3 – सुनील गावसकर – 1987
3 – राहुल द्रविड – 1999
3 – युवराज सिंग – 2011
3 – रोहित शर्मा – 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–किंग कोहलीने रचला इतिहास; सचिन-लारा सारख्या दिग्गजांनाही टाकले मागे
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्यानंतर अशी झालीत सेमीफायनलची समीकरणे
–भारताचे माजी प्रशिक्षक म्हणतात, केदार जाधवला या क्रमांकावर खेळवा