इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडला. यंदा आयपीएलचा १५ वा हंगाम असणार आहे. हा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा असणार आहे. कारण या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे नवे संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे लिलावात एकूण १० संघांमध्ये खेळाडूंच्या खरेदीसाठी चांगलीच चूरस पाहायला मिळाली. या दरम्यान, फिरकीपटू आर अश्विन हा देखील लिलावात स्टार खेळाडूंपैकी एक होता.
या लिलावासाठी आर अश्विनची २ कोटी मुळ किंमत होती. त्यामुळे त्याच्यासाठी संघांनी २ कोटींपासून बोली लावण्यास सुरुवात केली. अश्विननसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये सुरुवातीला स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर राजस्थान रॉयल्सने ५ कोटींच्या बोलीसह आर अश्विनला आपल्या संघात सामील करून घेतले.
अश्विन गेल्यावर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १६७ सामने खेळले असून १४५ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, अश्विनकडे तळात फलंदाजी करण्याचेही कौशल्य अवगत असल्याने तो संघांसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, घ्या जाणून एकाच क्लिकवर
मेगा लिलावात होणारी ‘एक्सेलरेशन बिडींग’ म्हणजे काय रे भाऊ?
IPL Auction 2022 | विश्वविजेत्या टीम इंडिया U19 संघातील १० खेळाडू मेगा लिलावात सामील, वाचा नावे