भारतात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, सर्वात महत्त्व जर कोणत्या खेळाला असेल तर ते म्हणजे क्रिकेटला. क्रिकेट हा खेळ इंग्लंड या देशाने सुरु केला आहे. परंतु क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे भारतात पहायला मिळतात. क्रिकेट म्हंटलं की लोक आपल्या हातातील कामे सोडून लोक टी.व्ही. पुढे जाऊन बसतात.
आता असा प्रश्न पडेल की, भारत म्हटल्यावर यामध्ये केवळ युवा पिढीच याकडे आकर्षित होत असेल. परंतु असे नाही तर अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना क्रिकेट पाहण्याची आणि खेळण्याची उत्सुकता लागलेली असते. हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या माध्यमांतून आपले क्रिकेटचे व्हिडिओ तयार करून ते शेअरही केले जातात.
लहान मुल जन्मले की त्यांचे आई-वडील आपल्या मुलाला आपण इंजीनियर, डॉक्टर, शिक्षक बनवण्याची स्वप्ने पहात असतात. परंतु जसा तो मुलगा मोठा होतो त्याचे क्रिकेटकडे आकर्षण खूप वाढते. कारण लहानपणापासूनच त्याच्या आयुष्यावर क्रिकेटची छाप पडलेली असते. टीव्हीवर क्रिकेट पाहून तसेच सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, कपिल देव आणि विराट कोहली या खेळाडूंप्रमाणे आपणही क्रिकेटपटू व्हायचे, हे स्वप्न अंगाशी बाळगून मुले क्रिकेट शिकण्यासाठी अकादमी जॉईन करतात. परंतु ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती नाही, ते आपल्या गल्लीत, मैदानांवर क्रिकेट खेळून आनंद लूटतात. काही लोकं याला गल्ली क्रिकेट तर काही गली क्रिकेट म्हणतात.
शहरापासून ते खेडेगावापर्यंत सगळीकडे गल्ली क्रिकेट खेळले जाते. अतिशय कमी संसाधनात एक चांगल्या दर्जाचे मनोरंजन यातून होते. हे क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला जागा तर कमी लागतेच परंतु तुम्ही अगदी कोणत्याही वेळी ते खेळू शकता.
पाठीमागे अगदी सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, केविन पीटरसन किंवा विराट कोहली यांनीही वेळात वेळ काढून गल्ली क्रिकेट खेळले आहे. क्रिकेट सामना सुरु असताना अनेक समालोचक खासकरुन मुंबईकर खेळाडू गल्ली क्रिकेटचा उल्लेख नक्की करतात.
जे खेळाडू गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी जमतात तेच याचे नियमही ठरवतात. याचे असे काही ठरलेले नियम नसतात. सामना सुरु होण्यापुर्वी जमलेले खेळाडूच हे नियम ठरवतात. तर या लेखात आपण अशाच हटके नियमांची ओळख करुन घेणार आहोत.
जर तुम्ही गल्ली क्रिकेट खेळला असला तर हे नियम तुम्हाला माहित असतील (15 amazing rules of gully cricket in India)
नियम-
१. जो संघ जिंकेल त्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळेल.
२. चेंडू थेट भिंतीला लागला की बाद.
३. षटकार मारला की बाद किंवा जो षटकार मारेल त्यानेच चेंडू आणायचा.
४. ज्या खेळाडूची बॅट त्याला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी आणि ज्या खेळाडूचा चेंडू त्याला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची संधी.
५. एका षटकातील ३ बॉल (बेबी ओव्हर) टाकून दुसऱ्याला गोलंदाजी सोपविणे.
६. चेंडू हरवला तर फलंदाजाने नुकसान भरपाई द्यायची.
७. चेंडू घराच्या छतावर गेला की बाद.
८. फूलटाॅस चेंडूची जास्त उंची असेल अन् मारता आला नाही तर ‘नो बॉल.’
९. सामना सुरु असताना खेळाडू बाद झाला आणि त्याच वेळी विरोधी संघाचा खेळाडू खाली बसला असेल तर बाद नाही.
१०. नदीमध्ये, नाल्यामध्ये चेंडू गेला तर बाद.
११. रस्त्याच्या थेट पलीकडे चेंडू गेल्यास बाद.
१२. गुडघ्याच्या खाली चेंडू लागला तर बाद.
१३. चेंडू सरपटी गेला तर १ धाव आणि वरून गेला की २ धावा.
१४. सलग 3 चेंडू हुकले की बाद.
१५. दोन्ही संघाचा एकच यष्टीरक्षक, त्याला फलंदाजीही दोघांकडून.
१६. वाईड चेंडू गेला की १ धाव.
१७. जो जास्त धावा करील तो पुढच्या डावात फलंदाजीला पहिला.
१८. फलंदाजाने डाव्या आणि उजव्या बाजूने फलंदाजी न करता कोणत्याही एकाच बाजूने फलंदाजी करणे.
१९. स्टंप्सच्या मागे चेंडू गेला की बाद.
२०. जो फलंदाज अधिक धावा करेल तो पहिला.
२१. वयाने मोठ्या फलंदाजाने तो उजवा असला तरी डाव्याने हाताने खेळणे.
२२. उलट्या बॅटने फटका मारला की बाद.
२३. यष्टीमागे धावाही नाही आणि विकेटही नाही.
२४. तीन वेळा चेंडू फलंदाजी करताना आडवला की बाद.
२५. एक टप्पा झेल बाद.
२६. पहिला विकेट देवाची.
२७. फेकी गोलंदाजावर बंदी.
२८. पंचांना शिवी दिली की २ धावा.
२९. फक्त ऑफसाईडलाच खेळायचं, स्टंपमागे गेलेला चेंडू फलंदाजानेच आणायचा.
३०. पहिला चेंडू, ट्रायल चेंडू.
वाचनीय लेख-
-ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया