इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील साखळी फेरीतील सामने पार पडले आहेत. आता प्लेऑफची फेरी सुरू होईल. पण या हंगामात सर्वांना आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे आयपीएलमधील सर्वात यशस्वी समजले जाणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली. त्यातही मुंबईला कर्णधार रोहित शर्माची चिंता अधिक सातावली. पण, आता रोहितनेच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईने (Mumbai Indians) अखेरचा सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात मुंबईला ५ विकेट्सने विजय मिळवण्यात यश आले. या सामन्यानंतर रोहित (Rohit Sharma) म्हणाला, ‘अनेक गोष्टी मला हव्या तशा घडल्या नाहीत. पण अशा गोष्टी यापूर्वीही माझ्याबरोबर झाल्या आहेत. त्यामुळे मी अशा परिस्थितीचा पहिल्यांदाच सामना करत नाहीये.’
रोहित पुढे म्हणाला, ‘मला माहित आहे, क्रिकेट इथेच संपत नाही. पुढेही खूप क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे मला मानसिक पैलूंची काळजी घेणे आवश्यक आहे आणि फॉर्ममध्ये परत कसे यावे आणि कशी चांगली कामगिरी करता येईल याचा विचार मी केला पाहिजे. मला केळव थोडं समायोजन करण्याची गरज आहे आणि जेव्हा मला रिकामा वेळ मिळेल, तेव्हा मी यावर काम करेल.’
रोहितने आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) १९.१४ च्या सरासरीने केवळ २६८ धावा केल्या. यामध्ये त्याच्या एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे, ज्यात रोहितला एकही अर्धशतक करता आलेले नाही.
‘हंगाम आमच्यासाठी निराशाजनक’ – रोहित
मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित म्हणला, ‘हा हंगाम आमच्यासाठी खूप निराशाजनक राहिला. आम्ही हंगामाच्या सुरूवातीला आमच्या योजनांना मैदानावर उतरवू शकलो नाही. आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये तुम्हाला लय बनवावी लागते. सुरुवातीला आम्ही एकानंतर एक सामने पराभूत झालो. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते की आम्ही आमच्या योजनानां आमच्या पद्धतीने मैदानात अजमावू. पण गोष्टी तशा झाल्या नाहीत, जशा आम्हाला हव्या होत्या.’
‘तथापि, एका नव्या संघाबरोबर असे होते, कारण खेळाडूंना आपली भूमिका समजण्यास थोडा वेळ लागतो. काही खेळाडू या संघासाठी पहिल्यांदा खेळत होते. बाकी संघांसाठी ते ज्या भूमिका निभावतात, त्याच्या तुलनेत त्यांना मुंबई फ्रँचायझीत वेगळ्या भूमिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना ताळमेळ साधण्यास वेळ लागला.’
रोहित पुढे म्हणाला, ‘दुसऱ्या सत्रात आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी आशा दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली. आमच्यासाठी ही सकारात्मक गोष्ट आहे की, जेव्हा आपण कोणता मोठा सामना किंवा स्पर्धा जिंकण्याची इच्छा ठेवतो, तेव्हा आपल्या असेच प्रदर्शन करण्याची गरज असते.’
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ हंगामात १४ पैकी १० सामने पराभूत झाले आणि केवळ ४ सामने जिंकले. त्यामुळे संघाला गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! उमरान मलिकचा वेगवान चेंडू आदळला थेट मयंकच्या बरगड्यांवर, सामनाही थांबला
‘जर स्वत:वर विश्वास ठेवला, तर…’, टीम इंडियात निवड होताच दिनेश कार्तिकने केली मनाला भिडणारी पोस्ट
‘आपना टाईम आयेगा’, अर्जुन तेंडुलकरसाठी बहीण साराची भावूक पोस्ट व्हायरल