ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याच्या मते सूर्यकुमार यादव भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो. सूर्यकुमार मागच्या वर्षीपर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये होता. फण यावर्षी त्याची बॅट शांत दिसली आहे. असे असले तरी, पाँटिंगच्या मते सूर्यकुमार भारताला वनडे विश्वचषक जिंकवून देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या कर्णधाराच्या मते भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी वनडे विश्वचषकातही सूर्यकुमारवर विश्वास दाखवला पाहिजे.
आयसीसी रिव्यू कार्यक्रमात रिकी पाँटिंग (Ricky Ponting) बोलत होता. यावेळी पाँटिंग म्हणाला, “जगात सर्वांना माहिती आहे की, सूर्यकुमार यादव काय करू शकतो. मागच्या एक दीड वर्षात त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. मला वाटते भारतीय संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. तो असा खेळाडू आहे, जो संघाला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो. तो सातत्याने यांगले प्रदर्शन करत नाहीये, पण तो मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. जसा ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्सने होता.”
“जेव्हा संघ या खेळाडूंना वेळ देत असतो, तेव्हा त्यांच्यासाठी ही एक संधीच असते. यामुळे त्यांना एक स्पष्ट दिशा मिळते. तुम्हाला जी अपेक्षा आहे, ही भूमिका पार पाडण्यासाठी त्यांना स्पष्टपणा मिळतो. एकट्याच्या जोरावर सामना जिंकण्याइतपत त्याच्याकडे प्रतिभा आहे. भारतीय संघासाठी मी देखील असेच प्रदर्शन असेच काहीतरी केले असते. एक सावध भूमिका घेण्यापेक्षा मी मॅच विनर खेळाडूला निवडले असते,” असेही पाँटिंग म्हणाला.
दरम्यान, टी-20 फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस वाडणारा सूर्यकुमार वनडे फॉरमॅटमध्ये मात्र अपेक्षित कामगिरी करू शकत नाहीये. सूर्यकुमारने भारतासाठी आतापर्यंत 21 वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 24.05च्या सरासरीने 433 धावा त्याने केल्या आहेत. नुकताच ऑस्ट्रेलियन संघाचा भारत दौरा पार पडला. सूर्यकुमारने या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत एकही धाव केली नाही. तीन सामन्यांच्या मायदेशातील वनडे मालिकेत सूर्यकुमार तिन्ही वेळी गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शून्य धावांवर) झाला होता. अशात वनडे विश्वचषकासाठी त्याला भारताच्या ताफ्यात संधी दिली जाणार की नाही? ये येणाऱ्या काळातच समजू शकेल. (‘Suryakumar Yadav will win the ODI World Cup for India,’ said Ricky Ponting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुवाहाटीत कोण मारणार बाजी? टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, राजस्थानचे ‘रॉयल्स’ करणार बॅटिंग
विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ