कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे नाव काही काळ एका वेगळ्या उंचीवर होते. परंतु महेंद्र सिंग धोनी(MS DHoni) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कुलदीप यादव क्रिकेटच्या पटावरून गायब झाल्याचे दिसत आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा कुलदीप यादव हा अंतिम 11 फळीमधील महत्वाचा सदस्य मानला जायचा. हा गोलंदाज जवळपास प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करताना दिसायचा. परंतु पुढे त्याला चहातून हळूच माशी बाहेर काढावी तसे, त्याला संघातून बाहेर काढले गेले. यानंतर आता कुलदीप यादवने मोठे खुलासे केले आहेत.
तो आकाश चोप्रा यांच्याशी बोलताना म्हणाला की, “मला अजिबात समजत नाही की संघाला माझ्याकडून काय हवे आहे? केवळ दोन महिन्यांच्या कामगिरीच्या आधारे विश्वचषक संघ निवडला जाईल, हे समजणे कठीण आहे. भारतीय संघामध्ये अनेकदा खेळाडूंना संधी का मिळत नाही? हे सांगितले जाते. पण आयपीएलमध्ये ही गोष्ट होत नाही.”
“कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) नेहमीच माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. जेव्हा तुमच्यात संभाषण नसते, तेव्हा बऱ्याच गोष्टी समजणे खूप कठीण होते. कधी कधी आपण खेळतोय की नाही हेही कळत नाही. या सोबतच संघाला तुमच्याकडून काय हवंय हेही कळत नाही?,” असेही त्याने म्हटले.
धोनिविषयी काय म्हणाला कुलदीप यादव?
धोनीविषयी बोलताना कुलदीप म्हणाला की, “मैदानावर आणि मैदानाबाहेर धोनीचा सल्ला खूप आठवतो. धोनीने विकेटच्या मागून दिलेला सल्ला कामी आला. मला अजूनही त्याचे सल्ला आठवतात. त्याच्याकडे खूप अनुभव होता आणि तो यष्टीच्या मागे आम्हाला चांगले मार्गदर्शन करत असे.”
रोहितमुळे कुलदीपला परत मिळणार संघातील जागा
असेही म्हटले जाते की, कुलदीपमुळे कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) आणि माजी भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यात वाद झाला होता. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर होता. तिसऱ्या कसोटी सामन्यात कुंबळेंना कुलदीप यादव याचा संघात समावेश करायचा होता, पण कोहलीने त्यावर आक्षेप घेतला.
कुलदीप यादवने आपल्या कारकीर्दीत 23 टी20 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी त्याने 65 एकदिवसीय सामन्यांमध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये 45 सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. यावरून कुलदीप यादव किती भेदक गोलंदाज होता हे दिसून येते. जरी तो बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर असला तरीही रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या स्वरुपात संघाचा कर्णधार झाल्याने कुलदीप यादव एकदिवसीय आणि टी20 संघात पुनरागमन करेल (Kuldeep Yadav To Comeback) अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: टीम इंडियाच्या कामगिरीवर कॅप्टन कोहली भलताच खुश, आनंदाने मैदानावरच धरला ठेका
विराट क्रिकेट खेळण्यात व्यस्त असताना, पत्नी अनुष्का हॉटेलमध्ये करत होती असं काही; फोटो आला पुढे
‘बिर्याणी, दो दिन बाद’, कसोटीत विकेट्सचे ‘द्विशतक’ करणाऱ्या शमीची गुरुजींनी घेतली फिरकी