क्रिकेटच्या मैदानात कधी कधी असे सामने पाहायला मिळतात, ज्यामध्ये एखादा संघ खूपच कमी धावसंख्येवर गुंडाळला जातो. टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांमध्ये असे सामने अनेकदा पाहिले गेले आहेत. पण आजपासून तब्बल ४३ वर्षांपूर्वी असा एक सामना खेळला गेला होता, ज्यामंध्ये गोलंदाजांनी विरोधी संघाला सामन्यातील षटकांच्या संख्येएवढ्या धावाही करू दिल्या नव्हत्या.
हा सामना खेळला गेला होता इंग्लंड आणि कॅनडा संघात. सन १९७९ या दोन संघातील हा सामना एकदिवसीय प्रकारातील होता. सध्या एकदिवसीय सामने ५० षटकांचे असताना, पण त्या काळात एकदिवसीय सामना ६० षटकांचा खेळला जात होता. इंग्लंडच्या गोलंदाजी एवढी धारदार होती, की कॅनडाचा संपूर्ण संघ अवघ्या ४५ धावांवर सर्वबाद झाला होता. मॅनचेस्टरमध्ये १३-१४ जून रोजी विश्वचषकातील एका सामन्यात ही नकोशी कामगिरी कॅनडाच्या नावावर झाली होती.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी सामन्यात कमाल प्रदर्शन केले आणि कॅनडा अवघ्या ४५ धावांवर सर्वबाद झाला. असे असले तरी, इंग्लंड संघाला देखील हे लक्ष्य सहजासहजी गाठता आले नाही. इंग्लंडने हे लक्ष्य गाठण्यासाठी १३ षटके खेळली आणि यादरम्यान संघातील २ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या होत्या. त्यांनी २७७ चेंडू आणि ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
कॅनडाचा कर्णधार ब्रायन मॉरिसेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणाने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. गोलंदाजांनी त्यांना ४०.३ षटकात सर्वबाद केले. यामध्ये बॉब विलिस आणि क्रिस ओल्डने प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. क्रिस ओल्डला सामनावीर निवडले गेले. त्याने टाकलेल्या १० षटकांमध्ये अवघ्या ८ धावा दिल्या आणि यापैकी ५ षटके निर्धाव होती. कॅनडाचा फ्रेंकली डॅनिस हा एकटा खेळाडू होता, ज्याने दोन आकडी धावसंख्या केली. डॅनिसने ९९ चेंडू खेळले आणि यामध्ये २ चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या.
माईक ब्रियरलीच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाची सुरुवात या सामन्यात चांगली झाली नाही. त्यांनी ११ धावांवर २ महत्वाच्या विकेट्स गमावल्या. सलामीसाठी आलेला ब्रियरली स्वतःचे खातेही खोलू शकला नाही. डॅरेल रँडलने ५ धावा केल्या. ज्यॉफ बायकॉट आणि ग्राहम गूचने तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावा केल्या आणि ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या पारड्यात, मालिका वाचवण्यासाठी भारत मैदानात; पाहा प्लेइंग इलेव्हन
INDvsSA T20: कार्तिकच्या आधी अक्षर पटेल फलंदाजीला आल्याने भारताच्या माजी दिग्गजाने सुनावले खडे बोल
दुर्दैवी! असा मृत्यू कोणाचाही होऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूंना अपघातात गमवावा लागलाय जीव