नुकतीच अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ही मालिका अफगाणिस्तान संघाने 2-1ने आपल्या नावावर केली. या शानदार विजयानंतर अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आयसीसी क्रमवारी यादीत झळकले आहेत. त्यांना आयसीसी टी20 क्रमवारी यादीत चांगला फायदा झाला आहे. अशातच अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारी यादीत अव्वलस्थान पटकावले. विशेष म्हणजे, त्याने श्रीलंकेचा गोलंदाज वनिंदू हसरंगाला पछाडत हे स्थान मिळवले आहे
शेवटचा 2018मध्ये बनलेला नंबर-1
खरं तर, अफगाणिस्तानने पहिल्यांदा द्विपक्षीय टी20 मालिकेत पाकिस्तान (Afghanistan vs Pakistan) संघाला मात दिली. तसेच, पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत (T20 Series) राशिद खान (Rashid Khan) याने शानदार प्रदर्शन केले. अशातच राशिदने एमआरएफ आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारीत (ICC T20 Bolwing Rankings) वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याला पुन्हा एकदा पछाडत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला. यापूर्वी राशिदने 2018मध्ये अव्वलस्थान पटकावले होते. त्यानंतरपासून त्याने खास कामगिरी केली आहे.
राशिदने यावेळी 710 गुणांसह अव्वलस्थान काबीज केले. त्याने 2018मध्ये बांगलादेशविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीनंतर त्याचे 816 टी20 गुण झाले होते. हे त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम गुण होते. दुसऱ्या स्थानी घसरलेल्या हसरंगा याचे आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारीत 695 गुण आहेत.
👑 A new No.1 👑
Afghanistan star rises to the top of the @mrfworldwide ICC Men's T20I bowling rankings after a brilliant series against Pakistan 👏
Details 👇 https://t.co/qDsBzuxoL2
— ICC (@ICC) March 29, 2023
राशिद खानने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यात 1 विकेट घेतली होती. मात्र, सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात त्याने गोलंदाजीतून सामान्य प्रदर्शन केले. राशिदचा संघसहकारी फजलहक फारूकी याने मालिकेत 5 विकेट्सची कमाई केली. यावेळी त्याने फक्त 4.75च्या इकॉनॉमी रेटने शानदार गोलंदाजी केली होती. तसेच, आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारीमधील अव्वल 10 खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानच्या तीन गोलंदाजांनी आपली जागा बनवली आहे. (icc t20 ranking rashid khan becomes world number 1 bowler surpassing wanindu hasaranga read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL2023 । मोठी बातमी : मुळ पाकिस्तानी खेळाडू करणार आयपीएलमध्ये हिंदीतून कॉमेंट्री, नाव जाहीर चर्चेला सुरुवात
पिक्चर अभी बाकी है! एमएस धोनीच्या IPL निवृत्तीवर रोहितचे मोठे विधान, ‘माही’प्रेमींनी वाचाच