आज भारतीय संघाचा माजी कर्णधार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा ४५वा वाढदिवस. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता ५ वर्षे झालीत. तरीही आजही असे अनेक विक्रम आहेत जे फक्त आणि फक्त सचिनच्या नावावर आहेत. त्यातील एक असाही विक्रम आहे जो जगातिल कोणत्याही क्रिकेटपटूला अापल्या नावावर व्हावा असे वाटेल.
वाढदिवसाच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या २५व्या वर्षी वनडेत शतकी खेळी केली होती. कोकाकोला कपच्या अंतिम सामन्यात त्याने आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध शारजात १३४ धावांची ही खेळी केली होती.
सचिनपुर्वी त्याचाच मित्र विनोद कांबळीने असा पराक्रम केला होता. वाढदिवसाच्या दिवशी वनडेत पहिल्यांदा शतकी खेळी करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्याच नावावर आहे. त्याने १८ जानेवारी १९९३ रोजी वयाच्या २१ वर्षी शतक केले होते. त्याने ही शतकी खेळी इंग्लड संघाविरुद्ध केली होती.
सचिननंतर सनथ जयसुर्याने ३९व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेश संघाविरुद्ध १३० धावांची खेळी कराची शहरात केली होती.
तर अगदी अलिकडे राॅस टेलर हा जगातील ४था खेळाडू ठरला ज्याने वाढदिवसाच्या दिवशीच वनडेत शतकी खेळी केली होती. त्याने ८ मार्च २०११ मध्ये विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध १२४ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. तेव्हा टेलरचे वय २७ वर्ष होते.
जगात वाढदिवसाच्या दिवशी@vinodkambli349 (१८ जानेवारी १९९३),@sachin_rt (२४ एप्रिल १९९८), सनथ जयसुर्या (३० जून २००८) आणि राॅस टेलर (८ मार्च २०११) यांनी वनडेत शतकी खेळी केल्या आहेत. त्यातील टेलर आणि सचिनची शतकी खेळी मला अधिक प्रिय. #SachinSachin #SachinTendulkar #HappyBirthdaySachin
— Sharad Bodage (@SharadBodage) April 24, 2018