लखनऊ सुपर जायंट्सने मंगळवारी (16 मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर गुणतालिकेत लखनऊ संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला, तर मुंबईला चौथ्या क्रमांकावर घसरावे लागले. मुंबई या सामन्यात पराभूत झाल्यामुळे प्लेऑफची शर्यत अधिकच रोमांचक बनली आहे. गुजरात टायटन्स आयपीएल 2023च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. आता राहिलेल्या तीन जागांसाठी एकूण 6 संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
असे आहे प्लेऑफचे समीकरण
लखनऊ सुपर जायंट्सकडे या विजयानंतर 15 गुण आहेत. त्यांना पुढचा सामना कोलकाता नाईट राडयर्सविरुद्ध खेळायचा आहे. जर पुढच्या सामन्यात लखनऊ संघ जिंकला, तर त्यांच्याकडे 17 गुण होतील आणि संघ प्लेऑफसाठी पात्र होईल. चेन्नई सुपर किंग्जकडे सध्या 15 गुण आहेत आणि लीग स्टेजमधील शेवटचा सामना सीएसकेला 20 मे रोजी खेळायचा आहे. जर चेन्नई या सामन्यात दिल्लीला पराभूत केले, तर संघ 17 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल.
मुंबई इंडियन्स 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पुढच्या सामन्यात मुंबईपुढे सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे. हैदराबादविरुद्ध मुंबईने विजय मिळवला, तर संघाकडे एकूण 16 गुण होतील आणि प्रकरण नेट रन रेटवर येऊ शकते. कारण मुंबईव्यतिरिक्त आरसीबी आणि पंजाब किंग्जकडेही 16 गुण मिळवण्याची संधी आहे. आरसीबी आणि पंजाबला अजून प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये जर या दोन संघांनी विजय मिळवला, तर मुंबई, आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सर्वोत्तम नेट रन रेट असलेल्या संघाला प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते.
दुसरीकडे राजस्थान आणि कोलकाता संघाला प्रत्येकी एक-एक सामना खेळायचा आहे. दोन्ही संघ जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत मजल मारू शकतात. प्लेऑफमधील चौथा संघ 14 गुणांसह निवडला जाण्याची शक्यता तशी पाहिली, तर कमीच आहे. मात्र तरीदेखील या दोन्ही संघाच्या आशा अंशता कायम आहेत. (The race for the playoffs gets more exciting after Lucknow beat Mumbai, know how the equation is)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरभजनची BCCIकडे कळकळीची विनंती, ‘या’ 2 युवा धुरंधरांना लवकरात लवकर घ्या टीम इंडियात
दुखापत खरी की खोटी? चाहत्यांचा कृणाल पांड्याला सवाल, पण उत्तर मिळाले अनुभवी अश्विनकडून