न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 2022 वर्षातील वार्षिक क्रिकेट पुरस्कार जाहीर केले. शुक्रवारी (24 मार्च) सकाळी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 11 विविध विभागातील या पुरस्कारांवर वेगवेगळ्या खेळाडूंनी आपली मोहर उमटवली. वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा मान अष्टपैलू डॅरिल मिचेल व सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार अष्टपैलू एमेलिया कर हिला मिळाला.
The winner of the Sir Richard Hadlee Medal for the first time, Daryl Mitchell!
Mitchell featured in 44 matches in 2022-23 for the team across three formats, the most of any player. He scored four Test hundreds in the awards period, and three in a row in England. #ANZNZCAwards pic.twitter.com/Y48F84rbhG
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 23, 2023
दरवर्षीप्रमाणे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपले पुरस्कार जाहीर केले. सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूसाठी देण्यात येणारे सर रिचर्ड हॅडली मेडल डॅरिल मिचेल याने आपल्या नावे केले. मिचेल मागील वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करत आला होता. त्याने 70.23 च्या सरासरीने 913 धावा केल्या होत्या. तसेच नऊ बळी मिळवण्यात देखील त्याला यश आलेले. इंग्लंड दौऱ्यावर ट्रेंट ब्रिज कसोटी त्याने 160 धावांची शानदार खेळी केली होती.
महिला विभागात सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठीचे डेबी हॉकले पदक एमेलिया करने पटकावले. तिने टी20 क्रिकेटमध्ये 423 धावा व 17 बळी टिपण्यात यश मिळवले होते. वनडे क्रिकेटमध्ये देखील तिची सरासरी 40 पेक्षा जास्त राहिली. करला वर्षातील सर्वोत्तम महिला टी20 क्रिकेटपटू पुरस्कारही मिळाला. तर, सुझी बेट्सने सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू पुरस्कार जिंकला.
पुरुष विभागात सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून टॉम ब्लंडल याची निवड केली गेली. तर, सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू व सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटू म्हणून अनुक्रमे मायकेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिप्स यांना सन्मानित केले गेले. देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडू म्हणून महिला विभागात केट अँडरसन व पुरुष विभागात डीन फॉक्सक्राफ्ट हे पुरस्कार विजेते राहिले. ख्रिस ब्राऊन हे सर्वोत्तम पंच म्हणून निवडले गेले. तर हीथ मिल्स यांना क्रिकेटमधील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.
(Newzealand Cricket Awards Daryl Mitchell And Amelia Kerr Announced Cricketers Of The Year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘द हंड्रेड’ ड्राफ्टमध्ये रिझवान-बाबर ‘दुर्लक्षित’! मुंबई इंडियन्सचा शिलेदार ठरला टॉप पिक
“बीसीसीआय आणि भारतीय संघ पराभवाला घाबरतात”, पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त विधान