कोलकाता: सप्टेंबर ते डिसेंबर या काळात भारतीय क्रिकेट संघ तब्बल २३ आंतरराष्ट्रीय सामने भारतात खेळणार असून त्यातील पाच सामने हे महाराष्ट्र राज्यात होणार आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूर शहरांना हे सामने आयोजनाचा मान मिळाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दौरा आणि कार्यक्रम समितीच्या कोलकाता येथे झालेल्या बैठकीदरम्यान पुढील ४ महिन्यांचे वेळपत्रक निश्चित करण्यात आले.
नागपूर
त्यात नागपूरला आॅस्ट्रेलियाविरुध्दचा पाच पैकी एक वनडे सामना, श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एका सामन्याचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.
मुंबई
मुंबईमध्ये न्यूझीलंडविरुध्दच्या वनडे मालिकेतील तीन पैकी एक सामना तसेच श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० एकी एक सामन्याचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.
पुणे
पुणे शहराला २३ पैकी एक १ सामना आयोजित करण्याचा मान मिळाला असून न्यूझीलंडविरुध्दच्या ३ एकदिवसीय सामन्यांपैकी एक सामना पुण्यात होणार आहे.
क्रिकेट वेळापत्रक
आॅस्ट्रेलियाविरुध्दची मालिका : सप्टेंबर-ऑक्टोबर
पाच एकदिवसीय : चेन्नई, बंगळुरु, नागपूर, इंदूर आणि कोलकाता
तीन टी-२० : हैदराबाद, रांची, गुवाहाटी
न्यूझीलंडविरुध्दची मालिका : ऑक्टोबर-नोव्हेंबर
तीन एकदिवसीय – पुणे, मुंबई आणि कानपूर
तीन टी-२० : नवी दिल्ली, कटक आणि राजकोट
श्रीलंकेविरुद्धची मालिका :नोव्हेंबर-डिसेंबर
तीन कसोटी : कोलकाता, नागपूर आणि नवी दिल्ली
तीन एकदिवसीय : धर्मशाळा, मोहाली आणि विजाग
तीन टी-२० : तरुवनंतपुरम / कोच्ची, इंदूर आणि मुंबई.