आशिया चषक 2022 मध्ये वेगवान गोलंदाज हर्षल पटेल भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध नव्हता. दुखापतीमुळे हर्षल आणि जसप्रीत बुमराह यांना आशिया चषक खेळता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मात्र या दोघांनी पुनरागमन केले आहे. बुमराह मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला नाही, तर दुसरीकडे हर्षल पटेल स्वतःची गुणवत्ता दाखवू शकला नाही. पहिल्या टी-20 सामन्यातील हर्षलचे प्रदर्शन पाहून माजी दिग्गज संजय मांजरेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषकानंतर पुनरागमन केल्यानंतर हर्षल पटेल (Harshal Patel) खूपच साधारन फॉर्ममध्ये दिसला आहे. पहिल्या टी-20 सामन्यात त्याने टाकलेल्या चार षटकांमध्ये तब्बल 49 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. यामध्ये एक षटका 22 धावांचे तर एक षटक 18 धावांचे होते. ही षटके ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाची ठरली आणि त्यांनी सामना चार विकेट्स राखून नावावर केला. संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या मते हर्षल पटेल ऑस्ट्रेलियाता खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघाला महागात पडू शकतो.
माध्यमांशी बोलत असताना हर्षल पटेल म्हणाला की, “हर्षल तोच आहे, ज्याला आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आपण त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे. तो असा गोलंदाज आहे, जो खेळपट्टी कोरडी असताना चांगले प्रदर्शन करतो. अशावेळी त्याचा संथ गतीचा चेंडू अधिकच सावकाश येतो. त्यामुळे खेळपट्टी सपाट आणि बाउंस असलेली आणि वेगवान असेल, तर संघासाठी हर्षल चिंतेची बाब असेल. ऑस्ट्रेलियात तुम्हाला अशीच परिस्थिती मिळेल. ही एक अशी गोष्ट असेल, ज्यावर भारत लक्ष देईल की, ऑस्ट्रेलियात हर्षल पटेलची गुणवत्ता किती प्रभाव पाडू शकेल.”
ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच खेळणार हर्षल पटेल –
हर्षल पटेलने मागच्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी पदार्पणाची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत भारतासाठी 18 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. असे असले तरी, हर्षलकटे ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर खेळण्याचा यापूर्वी कधीच अनुभव नाहीये. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये तो पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये खेळेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘याला काय अर्थ आहे, त्याला संधी दिली पाहिजे’, वाचा कुणाविषयी बोलला मॅथ्यू हेडन
एसए टी20 लिलावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारच राहिला ‘अनसोल्ड’! आता म्हणतोय…
रिषभ पंतने ‘या’ लहान चाहत्याचा दिवस बनवला खास! नागपूरात पोहोचताच केलय भारी काम