पुढील वर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एसए टी20 लीगचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिका तसेच विदेशातील अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लागताना दिसला. अगदी युवा खेळाडू करोडोंमध्ये विकले गेले. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या टी20 संघाचा कर्णधार टेंबा बवुमा याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. दोन्ही राऊंडमध्ये तो अनसोल्ड राहिला. त्याच्यावर कोणीही बोली न लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः बवुमाने प्रतिक्रिया दिली असून, आपण निराश झाल्याचे तो म्हणाला.
एसए टी20 लीगच्या लिलावात ट्रिस्टन स्टब्ससारख्या केवळ सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूला सर्वाधिक रकमेची बोली लागली. तसेच, निवृत्त झालेला इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गन याला देखील खरेदीदार मिळाला. मात्र, पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून नियुक्त केला गेलेला टेंबा बवुमा अनसोल्ड राहिला. या संपूर्ण प्रकरणावर आता बवुमाने पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“मी निराश नाही असे म्हटले तर हे नक्कीच खोटे वाटेल. या परिस्थितीच्या अधिक खोलात जाण्यापासून मी स्वतःला वाचवत आहे. या स्पर्धेत मला जबाबदारी सांभाळायला आवडले असते. मात्र, असे होऊ शकले नाही. माझ्याशिवाय फेकलुकवायो देखील असा खेळाडू राहिला आहे, ज्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे पुरेसे प्रतिनिधित्व केले होते. सध्या माझे लक्ष भारताविरुद्धची मालिका आणि विश्वचषक आहे.”
बवुमा हा सलग दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेचे टी20 विश्वचषकात नेतृत्व करणार आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेने चमकदार कामगिरी केली होती. मात्र, सरस धावगतीच्या जोरावर इंग्लंड संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया2022 स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अनावरण
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
बापरे! तब्बल २२ क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफला मिळाला होता केवळ एक रुपया