गेल्या काही दिवसांपासून महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप खूप चर्चेत आहे. आता या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकीब अल हसनच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपमध्ये शाकीब अल हसनच्या बहिणीचं कनेक्शन उघड झालंय. या प्रकरणी ईडीनं गिरीश तलरेजा आणि सूरज चोखानी यांना अटक केली होती. गिरीश तलरेजा आणि सूरज चोखानी हे महादेव ॲप प्रवर्तक हरी शंकर टिब्रेवाल यांचे जवळचे सहकारी आहेत. दोन्ही आरोपींनी चौकशीत मोठे खुलासे केले. यामुळे आता शाकिब अल हसनच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
गिरीश तलरेजा आणि सूरज चोखानी यांनी चौकशीदरम्यान सांगितलं की, त्यांनी बांगलादेशातील एक ॲप – 11wicket.com मध्येही गुंतवणूक केली होती. यामध्ये त्यांची सहकारी बांगलादेशी क्रिकेटर शाकिब अल हसनची बहीण जनातुल हसन आहे. आता या खुलाशानंतर शाकिब अल हसनच्या अडचणी वाढू शकतात असं बोललं जातंय.
शाकिब अल हसन सट्टेबाजीशी संबंधित वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयसीसीनं 2019 मध्ये शाकिबवर बंदी घातली होती. त्यावेळी शाकिब अल हसनवर बुकींशी संपर्क केल्याचा आणि याबाबत आयसीसीला माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. आता त्याच्या बहिणीचे सट्टेबाजांशी संपर्क असल्याचं उघडकीस आलंय.
याशिवाय मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरज चोखानीनं नेपाळच्या डेल्टिन कॅसिनोमध्येही 40 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या कॅसिनोमध्ये सूरज चोखानी याचा मोठा वाटा होता. त्याची सर्व गुंतवणूक ‘लोटस 365’ आणि ‘महादेव बुक ॲप’मधून मिळालेल्या बेकायदेशीर उत्पन्नातून केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र, दरम्यान, बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसनची बहीण जनातुल हसनचं नाव समोर आल्यानं या प्रकरणाला आता ॲंगल मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL मध्ये लांब केसांचा लूक घेऊन परततोय ‘थाला’! नेटमध्ये सरावाला सुरुवात; CSK ने शेअर केला व्हिडिओ
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!