आयपीएल 2024 मध्ये आज, गुरुवारी (दि. 11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. यामध्ये आरसीबी संघाने 5 सामन्यात 1 विजय मिळवला आहे आणि 4 सामन्यात पराभव पत्करलाय. 2 गुणांसह आरसाबी संघ 9व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई संघाने 4 सामन्यात 1 विजय आहे. आणि 3 सामन्यात पराभव झालाय. त्यामुळे 2 गुणांसह मुंबई गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना तसा दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.
आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन पाहता सध्याची सुरुवात त्यांच्यासाठी तितकी खास झालेली नाही. मुंबई इंडियन्सला प्रथम तिनही सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दिल्ली कॅपिटलविरुद्ध त्यांना पहिला विजय मिळाला. आज मुंबई आपल्या होमग्राउंड खेळणार आरसीबी विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे दुसऱ्या विजयासाठी मुंबईच्या संघात काही बदल होणार का ते पाहावे लागेल.
बंगळुरू संघासाठीही आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सर्वकाही प्रतिकूल घडताना दिसतंय. आरसीबीची यंदाची आतापर्यंतची कामगिरी पाहता, विराट कोहली वगळता संपूर्ण संघ कमी पडताना दिसतोय. त्यामुळे संघाला विजय मिळवण्यासाठी सांघिक प्रदर्शनाची गरज आहे. तसेचत संघात काही मोठे बदल होणे देखील अपेक्षित आहे.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे;
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा, ईशान किशन(यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, हार्दिक पांड्या(कर्णधार), रोमारिया शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेइंग 11 – फाफ डु प्लेसीस(कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, मयंक डागर, रीस टॉप्ले आणि मोहम्मद सिराज
अधिक वाचा –
– सामना एक पण रेकॉर्ड अनेक! शुबमन गिलची बॅट तळपली आणि विक्रमांचा पडला पाऊस, एका क्लिकवर वाचा त्याचे नवे रेकॉर्ड्स
– शंभर टक्के खरं आहे..! अब्जाधीश आकाश अंबानी बनला रोहित शर्माचा ड्रायव्हर, व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video
– राजस्थानचा विजयरथ रोखण्यात गुजरातला यश, रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारली बाजी, गिल-तेवतिया-रशीद विजयाचे हिरो!